Spread the love

…तर इराणमधील प्रत्येक ठिकाणी हल्ला करू

तेल अवीव / महान कार्य वृत्तसेवा

इसायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिलीय. नेतान्याहू यांनी एक व्हिडीओ स्टेटमेंट जारी करून म्हटले आहे की, इसायली हवाई दलाची लढाऊ विमाने लवकरच इराणमध्ये उड्डाण करतील. इसायल इराणमधील प्रत्येक ठिकाणी हल्ला करेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. त्यांनी सांगितले की, इसायलने इराणच्या मानवी क्षेत्रावर हल्ला केलेला नाही, तर इसायलने इराणच्या अणुकार्यक्रमाचे नुकसान केलंय. एवढेच नव्हे तर नेतान्याहू म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत इसायलने हवाई हल्ल्यांमध्ये इराणाच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित शास्त्रज्ञांनाही लक्ष्य केलंय. ते सर्व इराणमधील अणुकार्यक्रमाचे नेतृत्व करीत होते.

देशाच्या लष्करी कारवाईचे दुहेरी ध्येय – बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, ”नजीकच्या भविष्यात, तुम्हाला तेहरानच्या आकाशातून इसायली हवाई दलाचे विमान दिसतील. आम्ही अयातुल्ला राजवटीच्या प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक लक्ष्यावर हल्ला करू.” इराणने आतापर्यंत जे काही अनुभवले आहे ते येत्या काळात त्यांना ज्या गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे त्याच्या तुलनेत काहीच नाही. इसायली पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या देशाच्या लष्करी कारवाईचे दुहेरी ध्येय आहे, पहिले इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षा रोखणे आणि दुसरे त्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवणे.

इसायली ऑपरेशन रायझिंग लायनचे समर्थन – इसायलच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचा अणुकार्यक्रम अनेक वर्ष मागे गेलाय, असा दावा नेतान्याहू यांनी केलाय. त्यांनी असेही म्हटले आहे की, इराण बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करून इसायलला नष्ट करू इच्छित आहे. परंतु इसायल इराणची शस्त्र क्षमता नष्ट करीत आहे. इसायली ऑपरेशन रायझिंग लायनचे समर्थन केलंय. ‘आम्ही अंतिम टप्प्यात होतो. इराणचा अणु कार्यक्रम इसायलचा नाश करण्यासाठी अणुबॉम्ब बनवण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत होता.’ इसायलने शुक्रवारी पहाटे इराणच्या राजधानीवर हल्ला केला असून, इराणच्या अणुकार्यक्रमाला लक्ष्य केले आणि त्यांच्या अणु, क्षेपणास्त्र आणि लष्करी संकुलांवर नष्ट करण्याचा त्यांचा उद्देश आहे. प्रत्युत्तरादाखल इराणने इसायलवर हल्ले केलेत. दोन्ही देशांमधील संघर्ष आणि तणाव आणखी वाढला.

आयडीएफने इराणचे रॉकेट लाँचर उडवले – इसायली आर्मी आयडीएफने एका निवेदनात म्हटले आहे की, हवाई दलाच्या युद्ध विमानांनी इराणवर डझनभर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. इतकेच नाही तर इसायली हवाई दलाच्या विमानांनी क्षेपणास्त्र लाँचर्स ओळखले आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि आयडीएफने इराणचे रॉकेट लाँचर उडवून दिले.