Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

स्पेसएक्सनं 12 जून रोजी रात्री व्हँडनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून 26 नवीन स्टारलिंक उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले. फाल्कन 9 रॉकेटच्या 72व्या मिशननं स्टारलिंक नेटवर्कला बळकटी दिली, ज्यामुळं जागतिक इंटरनेट कव्हरेज वाढणार आहे.

उपग्रहांची संख्या 7,600 पेक्षा जास्त

स्पेसएक्सनं गुरुवारी, 12 जून 2025 रोजी रात्री 9:54 वाजता (एऊ) कॅलिफोर्नियातील व्हँडनबर्ग स्पेस फोर्स बेस येथील लाँच कॉम्प्लेक्स 4 ईस्ट (एथ्ण्-4ए) वरून 26 नवीन स्टारलिंक उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले. या मिशनमुळं स्पेसएक्सच्या स्टारलिंक मेगाकॉन्स्टेलेशनमधील सक्रिय उपग्रहांची संख्या 7,600 पेक्षा जास्त झाली आहे.

मिशन आणि फाल्कन 9

या मिशनमध्ये फाल्कन 9 रॉकेटचा पहिला टप्पा (1081ँ) 15व्या वेळी उड्डाण करून कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावरील ड्रोनशिपवर उतरला. स्पेसएक्सचा रॉकेट पुनर्वापराचा विक्रम 28 उड्डाणांचा आहे. हे 2025 मधील 72वे फाल्कन 9 प्रक्षेपण होते, त्यापैकी 53 स्टारलिंकसाठी होते.

स्टारलिंकचं उद्दिष्ट

एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सनं स्टारलिंक कॉन्स्टेलेशनचा विस्तार करून जागतिक इंटरनेट कव्हरेजमध्ये क्रांती आणली आहे. सध्या 7,600 हून अधिक उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असून, लहान सॅटेलाइट डिश आणि मोबाइल फोन्सद्वारे डझनभर देशांमध्ये रिअल-टाइम इंटरनेट कनेक्शन उपलब्ध आहे. कंपनी पुढील अनुप्रयोगांसाठी, इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी आणि आपत्कालीन संप्रेषण, पायाभूत सुविधा तयार करत आहे. येत्या काळात आणखी डझनभर प्रक्षेपण नियोजित असून, स्टारलिंक जागतिक इंटरनेट कव्हरेजला आणखी वाढवणार आहे.

दरम्यान, स्पेसएक्सचं स्टारशिप रॉकेट (एझ्अर्ण्ऐं एऊअींएकघ्झ्) 28 मे रोजी हिंदी महासागरात कोसळलं होतं. टेक्सासमधील स्टारबेसमधून उड्डाण केलेल्या या रॉकेटची ही नववी चाचणी होती. एलन मस्क (एथ्ध्ऱ् श्ळएख्) यांच्या मंगळ ग्रहावरील वसाहती निर्माण करण्याचा प्रयत्नासाठी हे रॉकेट महत्वाचं मानलं जात होतं. या मोहिमेत रॉकेटनं कक्षेत जाऊन नियोजित ठिकाणी सागरी अवतरण करायचं होतं, पण अर्ध्या तासातच त्याचं नियंत्रण सुटलं आणि ते पाण्यात पडलं.