Spread the love

अमरावती / महान कार्य वृत्तसेवा

प्रहार संघटेनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. मागील सात दिवसांपासून बच्चू कडू यांनी अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी, मेंढपाळ, मच्छीमार यांना न्याय मिळावा यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी सात दिवसांपासून अन्नत्याग केलंय. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी मोठा गोंधळ झाला.

जिल्हा शल्यचिकित्सकांचं आवाहन : बच्चू कडू यांच्यासोबत अन्नत्याग करणाऱ्या प्रहारच्या एकूण सात कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दोन जणांना उपोषण मंडपातच सलाईन लावलंय. सात दिवसांपासून अन्नत्याग केलेल्या बच्चू कडू यांची प्रकृती आता नाजूक अवस्थेत आहे. त्यांच्या शरीरात किरोटींनचं प्रमाण कामी झालंय. बच्चू कडू यांनी उपोषण मागं घ्यावं यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत घालण्याचं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केलंय.

सोमवारपासून जलत्याग : शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळ आणि बेरोजगार यांना न्याय मिळावा यासाठी राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी रविवारपासून अन्नत्याग केलंय. बच्चू कडू यांच्या या भूमिकेमुळे अमरावती जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी प्रहार कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी बच्चू कडू यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. समिती गठीत करून मागण्यांबाबत निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं. असं असताना आपलं आंदोलन अधिक तीव करण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला आहे. सोमवारपासून जलत्याग करणार असल्याचं बच्चू कडू यांनी जाहीर केलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ : बच्चू कडूंचं विविध मागण्यासाठी मागील सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. यामुळं बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या या आंदोलनांचे पडसाद शनिवारी पुण्यात देखील पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी मोठा गोंधळ झाला. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यांसाठी अजित पवारांचे भाषण सुरू होताच कार्यकर्त्यांनी जाब विचारला. यावेळी महिला आक्रमक झाल्याचं दिसून आलं. पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात अचानक गोंधळ उडाला. बच्चू कडू यांच्या उपोषणावरून आंदोलनकर्ते आक्रमक झालेले दिसले.

काय आहेत बच्चू कडू यांच्या मागण्या?

    शेतमालाला श्एझ् (किमान दर) वर 20म अनुदान द्यावे.

    आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापन करून 10 लाखाची आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी.

    धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करा.

    धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13 टक्के आरक्षण द्यावे.

    दिव्यांग आणि विधवा महिलांना 6000 रुपये मानधन द्यावे.

    शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना द्यावा.