Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेव

दाक्षिणेत अशी एक सुंदर अभिनेत्री आहे जिच्या साध्या जीवनशैलीची नेहमीच चर्चा होते. तिचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला माहितीये का अभिनय क्षेत्रात तिनं पदार्पण करण्याआधी ती योगा शिकवायची. त्यावेळी तिचा या फिल्मी दुनियेशी काही संबंध नव्हता. पण तिचं नशिब तिला इथे घेऊन आलं आणि ती दाक्षिणेतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक ठरली. तिनं बाहुबली सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये केलेल्या भूमिकेनं सगळ्यांचे लक्ष वेधले. एका योगा सेशन दरम्यान, दिग्दर्शक मेहर रमेश यांचं लक्ष तिच्यावर पडलं आणि त्यांना वाटलं की ही मुलगी खूब शांत आणि ग्रेसनं बोलचे. त्यानंतर ते या अभिनेत्रीला दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांना भेटायला घेऊन गेले. त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती कोण आहे?

आपण ज्या लोकप्रिय अभिनेत्री विषयी बोलतोय ती कोणी दुसरी नाही तर लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टी आहे. अनुष्का शेट्टीनं 2005 मध्ये तेलगू चित्रपट ‘सुपर’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन दिसले होते. अनुष्का शेट्टीच्या या पहिल्या चित्रपटानं त्यावेळी बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चांगली कमाई केली होती. पण अनुष्कासाठी एक चांगली सुरुवात झाली. चित्रपटाला चांगला फायदा मिळाला नसला तरी तिच्या करिअरची चांगली सुरुवात झाली.

या चित्रपटानंतर अनुष्कानं मागेवळून पाहिलं नाही. तिनं ‘महानंदी’, ‘विक्रमारकुडु’, ‘डॉन’, ‘अरुंधति’, ‘बिल्ला’, ‘वेदम’, ‘मिर्ची’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि या चित्रपटांमधील तिच्या अभिनयानं सगळ्यांचे लक्ष वेधले. यानंतर बाहुबली या चित्रपटामुळे अनुष्का ही ग्लोबल स्टार झाली. या चित्रपटाची तिकिटं मिळणं देखील कठीण झालं होतं. एस.एस.राजामौली यांच्या या ब्लॉकबस्टर फ्रेंचायझीला घेऊन लोकांमध्ये आजही क्रेझ आहे. या चित्रपटासाठी मोठा सेट बनवण्यात आला होता. आजही अनेक सिने चाहते हैदराबाद फिल्म सिटीमध्ये हा सेट पाहायला जातात. या चित्रपटात अनुष्कानं देवसेनाची जी भूमिका साकारली त्यानं सगळ्यांना मोठं स्टार बनवलं.

‘बाहुबली’ चित्रपटानं कमावले इतके कोटी

दरम्यान, प्रभाससोबत असलेली तिची जोडी आणि त्या दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अनेकांना तर या चित्रपटात त्या दोघांना एकत्र पाहून असं वाटलं की दुसरी कोणतीही अभिनेत्री देवसेनाच्या भूमिकेत चांगली दिसली नसती. ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लूजन’नं मिळून जवळपास 2400 कोटींची कमाई केली होती. देवसेनाची भूमिका देखील या दोन्ही चित्रपटांमधील महत्त्वाचा भाग होती. तर 2023 मध्ये अनुष्काचा ‘मिस शेट्टी मिस्टर पॉलीशेट्टी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता अनुष्का लवकरच ‘घाटी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हे कृष जगरलामुडी यांनी केलं आहे. त्याशिवाय ती एका मल्याळम हॉरलल-थिलर ‘कट्टानार’ चित्रपटात दिसणार आहे.