Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

11 जून रोजी जगभरातील बीटीएस आर्मीं (चाहते) जियोन जंग-कूक (जंगकूक)च्या घरी परतण्याचा आनंद साजरा करत होती. जून महिना हा बीटीएस सदस्यांसाठी खूप विशेष आहे, कारण या महिन्यामध्ये बीटीएस बॅन्डमधील किम नाम-जून (आरएम), किम तेह्युंग (व्ही) , जियोन जंग-कूक ( जुंगकुक), पार्क जी-मिन (जिमिन) हे सदस्य घरी परतले आहेत. याशिवाय मिन योंगी (सुगा ) हा 21 जून रोजी आपली सैन्य सेवा पूर्ण केल्यानंतर परत येणार आहे. यापूर्वी या बीटीएस बॅन्डमधील किम सेओक-जिन (जिन) आणि जंग होसेक (जे-होप)नं 2024मध्ये आपली मिलिट्री सर्विस पूर्ण केली होती. दरम्यान कोरियन माध्यमांनुसार 11 जून रोजी एका चिनी महिलेनं जंगकूकच्या घरात घुसून प्रयत्न केला.

जंगकूकच्या घरी चिनी महिलेनं घरात घुसण्याचा केला प्रयत्न : यानंतर या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण कोरियातील सियोलमधील योंगसान पोलिस स्टेशननुसार, ही महिला चिनी असून तिचे वय 30च्या आसपास आहे, असा दावा वृत्तात करण्यात आला आहे. आरोपी, सुश्री एनं 11 जून रोजी रात्री 11:20 वाजताच्या सुमारास योंगसान-गु येथील जंगकूकच्या घराच्या मुख्य दरवाजाचा पासवर्ड वारंवार दाबण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर एका शेजाऱ्यानं ही घटना पोलिसांना कळवली. यावेळी ताबडतोब तेथे पोलीस आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच आता महिलेने कबूल केले आहे की, ती जंगकूकच्या सैन्य सेवा पूर्ण झाल्यामुळे त्याला प्रत्यक्ष भेटण्यासाठी दक्षिण कोरियाला आली होती. आता याप्रकरणी पोलीस आणखी चौकशी करत आहेत. आता ही घटना घडल्यानंतर जंगकूकचे चाहते देखील चिंतेत आहेत. जंगकूकने सैन्य सेवा केली पूर्ण : जिमिनबरोबर आपला सैन्य तळ सोडलेल्या जंगकूकने डिस्चार्जनंतर मीडियाशी संवाद साधला होता. जिओन जंगकूकने म्हटले होते, ”मी कॅमेऱ्यासमोर येऊन खूप दिवस झाले आहेत, मला लाज वाटत आहे. मला आता काय बोलावं हे कळत नाही. वरिष्ठ, कनिष्ठ आणि इतर अधिकाऱ्यांनी आमच्यासाठी कठोर परिश्रम केल्याबद्दल धन्यवाद. आमची इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे.” दिवसाच्या शेवटी, दोघांनी हाइब कार्यालयात वेव्हर्स लाईव्हस्ट्रीमद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. आता देखील सोशल मीडियावर बीटीएस सदस्यांची काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ आणि फोटो बीटीएस आर्मी खूप पसंत करत आहेत.