इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
जमावबंदी आदेशाचा भंग करत पोलिस ठाण्याच्या आवारातच सार्वजनिक ठिकाणी धार्मिक प्रार्थना व भक्ती केल्याच्या कारणावरुन शिवाजीनगर पोलिसात माजी नगरसेवकासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल संतोष बाबुराव धनगर यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जिल्हाधिकार्यांनी जमावबंदी आदेश जारी केला असतानाही आणि पोलिसांकडून बेकायदेशीर प्रार्थना घेऊ नका, असे समजावून सांगत असतानाही ख्रिस्ती समाजातील अब्राहम आवळे, संजय आढाव, अलिस आवळे, अंकिता दत्ता कांबळे, दिपा प्रमोद कांबळे, योगेश महादेव पवार, संदीप शिवाजी कदम, पवन कृष्णा खोत, राजू बेनाडे, एक्स.एम.फर्नांडीस, सुनिल हेगडे, दिपक आवळे, रिजॉय राजन, संजय बनगे, सुभाष आवळे, राम केंगार, नंदकुमार कांबळे, संजय रेंदाळकर यांच्या अन्य 10 ते 15 जणांनी जमावबंदी आदेश झुगारुन देत पोलिस ठाण्याच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना प्रार्थना व भक्ती केली.
या प्रकरणी सरकारतर्फे या सर्वांवर बी.एन.एस.223 महाराष्ट्र पो.अधि.कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरिक्षक सचिन पाटील यांनी दिली.
