इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
सोमवार दि.8 रोजी दुपारी ३.३० चे सुमारास हातकणंगले ते कुंभोज जाणारे रोडवर नेज गावाचे हद्दीत आरोपी दिपक पुजारी व अन्य सात हे बेकायदेशीरपणे गांजा विक्रीसाठी येणार असलेचे स्थानिक गुन्हे अन्वेषन, शाखा कोल्हापूर यांना समजले नंतर त्यांनी छापा टाकला व आरोपींकडून एकुण ४१ किलो १९५ ग्रॅम इतका गांजा जप्त करणेत आला. तसेच त्याबाबत हातकणंगले पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करणेत आला. सर्व आरोपींना मे. कोर्टात हजर केले असता आरोपीच्या अटकेच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह निर्माण केल्यावर आरोपींची अटक ही बेकायदेशीर असलेचा युक्तीवाद करणेत आला. तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देषानुसार आरोपींना अटकेची कारणे दिलेली नसलेने आरोपींची तत्काळ मुक्तता करणेची विनंती करणेत आली.
इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त असलेने तसेच एन.डी.पी.एस. कायदयाखाली गुन्हा नोंद असलेने न्यायलयात वकील व पक्षकारांची गर्दी झाली होती. पेठवडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीसो, यांनी ऐतिहासिक निर्णय देताना सर्व आरोपींची अटक बेकायदेशीर ठरवुन सर्व आरोपींची तत्काळ सुटका करणेचे आदेश दिले.
मुळतः अटकच बेकायदेशीर असलेने न्यायालयाने कोणत्याही अटी व शर्तीशिवाय विना जामीन सर्व आरोपींना तत्काळ मुक्त केले. आरोपींना ४१ किलो गांजा जवळ बाळगले प्रकरणी न्यायलयात हजर केले असता हजर केलेल्याच दिवशी तत्काळ सुटका झालेने वकील वर्गात हा चर्चेचा विषय झाला. आरोपी तर्फे अॅड. सचिन यशवंतराव माने, अॅड. ओमकार कुरडे, अॅड. संकेत परमाजे यांनी काम पाहिले.
