इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील सहाय्यक शिक्षिका व नदी समन्वयक, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, महाराष्ट्र जलबिरदारीच्या सदस्य यांचा राजस्थान येथे सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह व प्रमुख पाहुणे सकाळ माध्यम समूहाचे डॉ.श्रीराम पोवार यांच्या शुभ हस्ते, तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत “प्रकृती – संवादक” या पुरस्काराने शाल व सन्मान पत्र देऊन रीटा रॉड्रीग्युस यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या अभियानाच्या त्या सक्रिय सदस्य आहेत. त्यांच्या या पुरस्कारासाठी सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
