Spread the love

वेश्याववसात व्हाईट कॉलर व्यक्ती सक्रिय

जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा

जयसिंगपूर शहर स्मार्ट सिटी तसेच औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येत आहे. या ठिकाणी तंबाखूची बाजारपेठ असून सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले हे शहर आहे. यामुळे या ठिकाणी कामानिमित्त बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या ही बऱ्यापैकी आहे. यामुळे शहरात व शहर परिसरातील महामार्गावर लॉजिंग ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी प्रवाशांच्या बरोबर वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चाही शहरांमध्ये ऐकायला मिळत आहे. यामुळे लॉज व्यावसायिकांना अच्छे दिन आल्याची चर्चाही क्रांती चौकात आहे.

जयसिंगपूर शहर परिसरामध्ये औद्योगिक वसाहती असल्यामुळे तसेच तंबाखूची बाजारपेठ या ठिकाणी असल्यामुळे कर्नाटक, गोवा, मुंबई, पुणे या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात शहर व शहर परिसरातील महामार्गावर लॉजिंगची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचबरोबर अनेक लॉज मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चाही शहरांमध्ये ऐकायला मिळत आहे.

व्यवसायासाठी शहरातील अनेक व्हाईट कॉलर व्यक्ती सक्रिय असल्याचे समजते. गिऱ्हाईकांच्या मागणीनुसार असे व्हाईट कॉलर व्यक्ती वेश्या पुरवत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन हे व्हाईट कॉलर व्यक्तिंना मिळत असल्याची चर्चा आहे. या व्यवसायातून अनेक लॉज व्यवसायिक तसेच व्हाईट कॉलर व्यक्ती मालामाल झाल्याची ही चर्चा शहरामध्ये आहे. अशा बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजची तपासणी पोलिसाकडून होणे आवश्यक असतानाही, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. पूर्वी शहरामध्ये एखादे दुसरे लॉज होते. मात्र मोठ्या प्रमाणात लॉजची संख्या का वाढली? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकंदरीत पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर वेश्या व्यवसायाला आळा घालने गरजेचे बनले असल्याचे जयसिंगपूर येथील नागरिकांमधून बोलले जात आहे.