Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयावर शंका घेणारा लेख लिहिलाय. खरं तर हा लेख देशातील अनेक वृत्तपत्रांनी छापला असून, यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय. भाजपानं हा एकतर्फी विजय मिळवलाय, विधानसभा निवडणुकीत विजय भाजपाने हायजॅक केलाय, अशी टीका संजय राऊतांनी केलीय.

सहा महिन्यांत असं काय घडलं? : दरम्यान, राहुल गांधी ही सामान्य व्यक्ती आहे. राहुल गांधी ही संवैधानिक पदावर आहेत. त्यांनी जे मुद्दे मांडलेत ते संवैधानिक पद्धतीने मांडले आहेत आणि राहुल गांधींचा लेख देशातील प्रमुख 16 वृत्तपत्रांनी छापला आहे. तो लेख जनतेपर्यंत पोहोचला आहे म्हणून भाजपाचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा तीळपापड झालाय. भाजपा हा उघडानागडा पडलेला आहे. त्यांचा खोटा चेहरा समोर आला आहे. यावर जरी देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहिला तरी ग्रंथ लिहावा, गीता लिहावी, पण भाजपाच्या विरोधात वातावरण असताना गेल्या 6 महिन्यांत असं काय घडलं? की भाजपाला एकतर्फी विजय मिळाला? मी तर म्हणतो विधानसभेची निवडणूक झालीच नाही. भाजपाने विधानसभेची निवडणूक हायजॅक केली, असा आरोप संजय राऊतांनी केलाय.

आयोगाने विजयी जागांचे वाटप केले : भाजपाचे नेते म्हणताहेत राहुल गांधी खोटे बोलतात. खोटे बोलण्यात जर देशात नोबेल पुरस्कार कोणाला द्यायचाच असेल तर तो मोदींना दिला पाहिजे. कारण ते सातत्याने खोटे बोलतात. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना फोडले. त्यांना हाताशी धरून निवडणूक लढवली. भाजपाने विधानसभा निवडणुकीत काय ताकद होती. ते 25 जागा जिंकू शकत नव्हते. एकनाथ शिंदेंच्या 10-15 जागा येऊ शकतात. अजित पवारही त्याच रेंजमध्ये होते. पण निवडणूक आयोगाने तिन्ही पक्षांना विजयाचे जागा वाटप केले, असा हल्लाबोल राऊतांनी निवडणूक आयोगावर केलाय. मतदान केंद्रावर ज्याला सेटिंग्ज म्हणतात ते केले गेले. यावर राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत. भूमिका मांडली आहे. त्यामुळं देशात आणि जगात लोकशाही माननाऱ्या लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. देशातील जनतेला कळलंय की, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांची कंपनी कशा प्रकारे निवडणुका जिंकतात.

ते कसले बाळासाहेबप्रेमी? : तुम्ही जे एकनाथ शिंदेंवर आरोप केलेत, त्यावर शिंदेंनी उत्तर दिलंय की, मी बाळासाहेबांच्या विचारांना कधी बट्टा लावला नाही आणि राऊत बोलले तसे मी कधी बोललो नाही, असा प्रश्न राऊतांना विचारला असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे किती खरे आणि किती खोटे बोलतात हे त्यांनी स्वत:च्या मनाला विचारावे. एकनाथ शिंदे हे अत्यंत खोटारडे, भष्ट, बकवास आणि घोटाळेबाज आहेत. ते कसले बाळासाहेबप्रेमी?, त्यांनी जे 3 हजार कोटींची कमिशनबाजी केली, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हल्ला केलाय, यात तुम्ही किती खरे आहात हे स्पष्ट होतेय. मी जे बोललो, ते खरे आहे, मी त्याचा साक्षीदार आहे, अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केलीय. …मग यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत : सध्या लष्कराच्या गणवेशातील फोटोमधील पंतप्रधान मोदींचे पोस्टर लावण्यात आलेत. पण संविधानात काही नियम, कलम आहेत की, जर तुम्ही लष्कराचा गणवेश घातला किंवा लष्कराचं कोणतेही साहित्य, पदकं किंवा अन्य काही वापरलं तरी तुमच्यावर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. पण भाजपाचे हे प्रमुख ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर बिहार निवडणुकीच्या धरतीवर मोदी आणि भाजपाचे नेते लष्करातील गणवेश घालून फोटो काढतात. हेच जर सामान्य लोकांनी केले असते, तर गुन्हे दाखल झाले असते. मग यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाहीत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.