Spread the love

ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर राजकीय पक्ष स्थापन करण्याचे दिले संकेत

वॉशिंग्टन / महान कार्य वृत्तसेवा

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वाद आता एका नवीन वळणावर पोहोचला आहे. आता मस्क यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळं एलॉन मस्क यांना राष्ट्राध्यक्ष व्हायचं आहे का? अशी चर्चा जगभरात सुरू झाली आहे.

80 टक्के नागरिकांनी दिला एलॉन मस्क यांना पाठिंबा : गुरुवारी एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्यात मोठा वाद झाला होता. या वादानंतर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी एक्स सोशल मीडियावर एक पोल तयार केला. यामध्ये त्यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे का? असा पोल तयार केला. यावर 80 टक्के लोकांनी त्याला पाठिंबा दिला.

ट्रम्प – मस्क वादाचा दणका टेस्लाच्या शेअर्सला : व्हाईट हाऊसचा 4 ट्रिलियन डॉलर्सचा खर्च आणि कर बिलावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सीईओ एलॉन मस्क यांच्यात झालेल्या जोरदार वादानंतर गुरुवारी टेस्लाचे शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक घसरले.

‘बिग ब्युटीफुल बिल’ योजनेवरून ट्रम्प-मस्क यांच्यात वाद : ‘बिग ब्युटीफुल बिल’ नावाच्या योजनेवरून ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद वाढला. ट्रम्प यांनी ही योजना जाहीर केल्यानंतर एलॉन मस्क यांनी त्यावर टीका केली. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मस्क यांच्यावरील टीका जसजशी वाढत गेली तसतशी दोघांमधील दरी आणखी वाढत गेली.

डोनाल्ड ट्रम्प याचा एलॉन मस्क यांच्यावर आरोप : ‘बिग ब्युटीफुल बिल’ या नवीन योजनेमुळं इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी कर सवलती रद्द केल्यामुळं एलॉन मस्क नाराज आहेत. मस्क आणि ट्रम्प यांच्यातील वादामुळं बिघडलेल्या संबांधांमुळं एलॉन मस्क यांच्या व्यवसायाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी गुंतवणुकदारांना भीती आहे. डोनाल्ड ट्रम्प माझ्याशिवाय निवडणूक हरले असते : ”मी नसतो तर ट्रम्प निवडणूक पराभूत झाले असते. डेमोक्रॅट्‌‍स हाऊसवर नियंत्रण ठेवतील आणि रिपब्लिकन सिनेटमध्ये 51-49 असतील, असा इशारा मस्क यांनी दिला. अमेरिकेवरील कर्जाचा बोजा वाढत आहे. एक नवीन खर्च विधेयक तयार केले पाहिजे. तूट जास्त वाढवू नये आणि कर्जाची मर्यादा त्र्5 ट्रिलियनपर्यंत वाढू नये, अशी अपेक्षा मस्क यांनी व्यक्त केली. एलॉन मस्क यांनी अलीकडंच ट्रम्प यांच्या सरकारी कार्यक्षमता विभाग किंवा ध्उए च्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.