Spread the love

काही मिनिटांत गॅस गळती, आजूबाजूंच्या घरालाही आग, 6 तासांपासून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

रत्नागिरी / महान कार्य वृत्तसेवा

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीतल्या निवळी येथे सकाळी 7.45 वाजता एलपीजी टँकर आणि मिनी बसचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये मिनी बसमधील 29 शिक्षक आणि एक चालक जखमी झाले. यामध्ये 16 महिला आणि 14 पुरुषांचा समावेश आहे.

अपघात होताच एलपीजी टँकरमधून गॅस गळती सुरु झाली. या गॅस गळतीमुळे बाव नदी पुलाजवळील घरांना आग लगाली. तसेच अनेक गाड्याही जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. आजूबाजूच्या परिसरात असणारी आंब्याची कलम देखील जळाली. मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक गेल्या 5 तासांपासून ठप्प आहे. महामार्ग सुरू होण्यासाठी आणखी 3 तास लागू शकतो. दरम्यान, यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.

कोण कोण जखमी झाले?

संतोष जागुष्टे (28), विराज राजाराम सावंत (41,रा.सावर्डे), मंदार सुखदेव खाडे(53), स्मिता मधुकर पाटील(48), उषा अमोल खुडे(38), जयश्री सुर्यकांत गावडे (54), प्रियंका दिलीप जाधव (38), स्नेहा संतोष मिस्त्री (47), धर्मेंद्र दत्तात्रय के देरुगडे (53), दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे(53), सुलक्षणा संभाजी पाटील(40), निशिकांत दिनानाथवा वानरकर (51), रुपाली  सुकांत यादव (50), हर्षाली हेमंत पाकळे (36), निता विनायक बांदरे (38), मिना सुभाष घाडगे (52), कमल किशोर महाडिक(37), प्रेमकुमार बबन शिवगण (35), अमोल गणेश कोनवाल(35), मनिषा संतोष कांबळे (47), मालिनी दिपक  चव्हाण(40), श्वेता संजय चव्हाण(48), राजेश यादव(47),गणेश महादेव सावर्डेकर(45), सुरेंद्र दिपक सावंत(50), सचिन अशोक पोकळे(43),उदय पांडूरंग खताते(52), अरविंद अनंत सकपाळ (57), मिना विनायक शिरकर(38) आणि रोहित राजेंद्र चव्हाण(35) अशी अपघातामधील 30 जखमींची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

सकाळी 7.45 वाजता मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात मिनी बस आणि गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये अपघात

अपघातामध्ये मिनी बसमधील 29 शिक्षक आणि एक चालक जखमी

यामध्ये 16 महिला आणि 14 पुरुषांचा समावेश

अपघातानंतर पलटी झालेला टँकरमधून मोठ्या प्रमाणामध्ये गॅस गळती सुरू

जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे हलवले.

मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सध्या मागील पाच तासांपासून पूर्णपणे ठप्प

गोव्यावरून येणारी वाहतूक पाली आणि उक्षी मार्गे वळवली तर मुंबईहुन गोव्याकडे जाणारी वाहतूक संगमेश्वरमार्गे वळवली.

घटनास्थळी तज्ञांची टीम दाखल, पलटी झालेल्या टँकरमधून गॅस काढून वाहतूक केली जाणार पूर्ववत