पिंपरी चिंचवड शहरात पावसाची जोरदार बँटींग ; हिंजवडी परिसरात पाणीच पाणी
पिंपरी / महान कार् वृत्तसेवा
राज्याच्या काही भागामध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी आलेल्या दमदार पावसामुळे आयटी पार्क हिंजवडी हा परिसर वॉटर पार्क हिंजवडी झाला आहे. फक्त काही मिनिटे आलेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्याने तुंबले आहेत. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाकी वाहन देखील वाहून गेले आहेत. पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्याने आज आयटी पार्क हिंजवडी वाटर पार्क हिंजवडी झाल्याची वेळ ओढवली आहे. टेल्को रोड, लांडेवाडी, हिंजवडी या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लांडेवाडी आणि भोसरी एमआयडीसी हद्दीत देखील काही मिनीटांच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी 10 वाजता काही मिनिटांसाठी झालेल्या पावसाने प्रशासनाची पोलखोल झाल्याचं समोर आलं आहे. दोन्ही ठिकाणी नाल्यांमुळे ही अवस्था निर्माण झाली आहे. पावसाळी नियोजनाच्या नावाखाली बैठका आणि त्याच्या प्रेसनोट एवढंच सुरू असल्याच्या चर्चा आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावरती संताप व्यक्त केला आहे.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट
हिंजवडी फेज 2 परिसरामध्ये काही मिनीटामध्ये पावसामुळे जागोजागी पाणी साचलं. प्रशासनाच्या या कारभारावरची खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे, त्यांनी सोशल मिडियावरती पावसाचे, पाणी साचल्याचे व्हिडीओ टाकत पोस्ट लिहली आहे. ”हिंजवडी फेज 2 परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळ आणि इतर अनेक भागांत जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते. येथील नालेसफाईसारखी कामे वेळेत होण्याची गरज आहे. परंतु ही कामे वेळेत झालेली दिसत नाहीत. एमआयडीसीने याबाबत तातडीने लक्ष घालून येथे भविष्यात पाणी साठून नागरीकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे.”
मुंबईला पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट
मुंबई आणि मुंबई उपनगरासाठी पावसासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच दक्षिण मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे. तर नवी मुंबईतही पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबईसाठी पुढल्या तीन महत्वाचे ठरणार आहे. कारण, पुढील 3 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिणामी, मुंबई आणि उपनगरांत 2 तारखेपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचे चिन्ह आहे.