इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेमध्ये सहकारी बँकांना सक्षम करण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज बँकींग करता यावे यासाठी, कलाप्पाण्णा आवाडे इचलकरंज जनता बँकेच्या वतीने बँकेच्या स्टेशन रोड, इचलकरंजी येथे आचोजित केलेल्या चर्चासत्रास, इचलकरंजी व आसपासच्या परिसरातील सहकारी बँकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
सदर प्रसंगी दि महाराष्ट्र राज्य अर्बन बँक्स फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ.वैशाली आवाडे उपस्थित होत्या. सदर प्रसंगी प्रतिपादन करताना त्या म्हणाल्या, देशाच्या आर्थिक विकासामध्ये सहकारी बँकींग क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे. तथापि, महाराष्ट्रातील मोठमोठ्या सहकारी बँकांवरोबरच ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या सहकारी बँका सुध्दा समाजसेवेचे व्रत हाती घेवून सातत्याने कार्यरत आहेत, अशा बँकांना आर्थिक सुबत्ते अभावी तांत्रिकदृष्टया प्रगती करण्यासाठी अनेक अडचणीतून मार्गक्रमन करावे लागत आहे. या बँकांचा सर्वतोपरी विकास व्हावा व तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नॅशनल अर्बन को-ऑप फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि., मुंबई ही संस्था अंग्रेला ऑर्गानायझेशनच्या माध्यमातून एक वरदान ठरणार आहे. या संस्थेच्या माध्यमातूनन लहान सहकारी बँकांनासुध्दा मोठा दिलासा मिळणार असल्याचे सूतोवाच त्यांनी सदर प्रसंगी केले.
पुढे, नॅशनल अर्बन को-ऑप फायनान्स अँड डेव्हलपमेंट कापरिशन लि.,मुंबई (NUCFDC) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली एकाच छताखाली सहकारी बँकींग क्षेत्राला आवश्यक असलेली सर्व सॉफ्टवेअर, हार्डवेअर, कायदेशीर अभिप्राय, पाठशाळा, अंग्रेला ऑर्गानायझेशनचे सदस्यत्व, भारतीय रिझर्व्ह बँकेस आवश्यक असलेल्या सर्व निर्देशांचे पालन करुन त्याची पुर्तता करणे, भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सर्व परिपत्रकांचे मराठीमध्ये मुद्देसूद मराठी अनुवाद, या संस्थेकडून सहकारी बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेस आवश्यक असलेल्या प्रत्येक अडचणींचे निर्मुलन सहजसुलभ करुत देण्यासाठी अंब्रेला ऑर्गानायझेशन ही संकल्पना अंमलात आणली, असल्याचे प्रभात चतुर्वेदी व पद्मभूषण बहादुरे यांनी सदर प्रसंगी सूतोवाच केले.
पद्द्मभूषण बहादुरे, सीटीओ यांनी स्लाईडशोच्या माध्यमातून अंध्रला ऑर्नानायझेशन अन्यवे सहकारी बँकांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांची इत्यंभूत माहिती दिली. इतकेच नव्हे तर, या चर्चासत्रामध्ये उपस्थित असलेल्या अनेक बँकांचे चेअरमन व पदाधिकाऱ्यांनी त्यांना बैंक चालवत असताना असलेल्या अडचणी सांगून, त्यावर पर्यावरूपी तोडगा देण्याचे यशस्वी कार्य या चर्चासत्राच्या माध्यमातून करणेत आले.
या चर्चासत्रामध्ये इचलकरंजी तसेच आसपासच्या परिसरातील सहकारी बँकांचे सन्माननीय चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकार संजय शिरगावे यांनी अंब्रेला ऑर्गानायझेशन हे एक सहकारी बँकांसाठी वरदान असून, येथून पुढील काळात नवसंजीवनी देण्याचे कार्य करणार असल्यामुळे, सर्वच बँकांनी अंग्रेला ऑर्गानायझेशनचे सदस्यत्व स्विकारुन, सहकारी चळवळ सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले.
बँकेचे व्हा. चेअरमन सीए संजयकुमार अनिगोळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
सदर प्रसंगी इचलकरंजी व आसपासच्या परिसरातील अनेक बँकांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. तसेच कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे सर्व संचालक, जनरल मॅनेजर किरण पाटील, दिपक पाटील व अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
