रूकडी / महान कार्य वृत्तसेवा
रुकडी-इचलकरंजी मार्गावर आलासे मळा येथे रस्ता रुंदी करण्याच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात आली आहे.ही वृक्षतोड नागरिकांच्या भल्यासाठी झाले आहे काय कोणा उद्योजकाच्या भल्यासाठी झाले आहे हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.कारण तेथे नुकताच एक पेट्रोल पंप होत आहे.हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याच्या परवानगी घेऊनच हे वृक्षतोड झाल्याचे सांगितले जात आहे.पेट्रोल पंप बनवण्यासाठी रस्ता रुंदीकरण आवश्यक असल्याने हे वृक्षतोड झाल्याच्या सांगितले जाते. या वृक्षतोडीच्या बदल्यात त्या झाडांचे पुनर्वसन देखील करणार असल्याचे सांगितले जाते.तसेच या बदल्यात शंभर नवीन वृक्ष लावण्याचे मान्य करण्यात आले आहे.असे जरी असले तरी एकीकडे पर्यावरण रक्षणासाठी “झाडे लावा झाडे जगवा”असे म्हटले जाते.परंतु सत्य वेगळेच चित्र दिसत आहे.जागतिक स्तरावर पर्यावरणाच्या संवर्धन संदर्भात अनेक गोष्टी बोलल्या जातात परंतु जोपर्यंत नागरिक सज्जक होणार नाही तोपर्यंत पर्यावरण संवर्धनाच्या गोष्टी कागदावरच असतील.पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणेसाठी भारत सरकारद्वारे १९८६ (Environment Protection Act ) पर्यावरण संरक्षण कायदा नुसार पर्यावरण आणि वनखाते यांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. याचे उल्लंघन झाल्यास सात वर्षाची शिक्षा आणि दंड लागू केला जातो. याची जरी माहिती प्रत्येकाला माहिती आहे. असले तरी “कायद्याला पळवाटा असतात” मग पर्यावरण संवर्धन संदर्भात डोळसपणे पाहणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे?
रस्ता रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी घेऊनच वृक्ष काढत असून.तसेच त्याचे पुनर्वसन देखील लगेच आम्ही करत आहोत.आणि याबद्दल शंभर वृक्ष लावण्याचे काम देखील आम्ही लवकरच करणार आहे.
सुभाष किनिंगे पेट्रोल पंप मालक
रुकडी गावात वृक्ष संवर्धनासाठी कार्य करणारी स्वयंसेवा संस्था आहे. या संस्थेला राज्यस्तरावर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे.त्यांच्या कार्यामुळे रुकडी गावाला वनराई स्वरूप प्राप्त झाले आहे. चार ते पाच हजार वृक्ष संवर्धन व जतन या संस्थेने केले आहे. ऑक्सीजन पार्कची निर्मिती केली आहे. या संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे.परंतु त्यांनी केलेल्या कार्यावर वारंवार काही समाजकंटकाकडून वरवंटा फिरवण्याचे काम केले जात आहे.नागरी सुविधाचा दाखला देऊन अनेक वेळा वृक्षतोड करण्यात आली आहे.
