अभिनेता दुसऱ्यांना होणार वडील!
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
अनेकदा अभिनेत्री लग्नाआधी प्रेग्नंट होतात, तर कधी 60 व्या वर्षी अभिनेता वडील बनतो. मनोरंजन विश्वातून अशा प्रग्नंसीबाबतच्या हटके बातम्या समोर येत असतात. अशातच आणखी एक बातमी समोर आलीय. 22 वर्षाचा मुलगा असताना प्रसिद्द अभिनेता आता 57 व्या वर्षी वडील बनणार आहे. ही बातमी सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचं काम करत आहे.
अभिनेता आणि चित्रपट निर्माता अरबाज खान 57 व्या वर्षी पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नी शूरा खान गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. आता तिच्या एका व्हायरल व्हिडिओने या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे, ज्यात तिचा बेबी बंप अगदी स्पष्ट दिसत आहे.
अरबाज खान होणार बाबा
लवकरच खान कुटुंबात एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अरबाज खान दुसऱ्यांदा वडील होणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. याआधी त्याला त्याची पहिली पत्नी मलायका अरोरा हिच्यापासून अरहान खान नावाचा एक मुलगा आहे, जो आता 22 वर्षांचा आहे.
दरम्यान, गेल्या काही काळापासून शूरा खानच्या गरोदरपणाबद्दलच्या बातम्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होत्या. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या एका लेटेस्ट व्हिडिओमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये शूरा खान एका काळ्या रंगाच्या आकर्षक पोशाखात दिसत आहे आणि तिचा बेबी बंप सहजपणे दिसत आहे. यानंतर, लवकरच अरबाज आणि शूराच्या घरात पाळणा हलणार हे निश्चित झालं आहे.
