इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वात येऊन 29 जून रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त महापालिकेच्या वतीने दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून, सदर मेळाव्याचा इचलकरंजी सह परिसरातील बेरोजगार युवक युवतीनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले आहे.
एक जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून सदरचा रोजगार मेळावा छत्रपती शाहू हायस्कूल येथे होणार आहे. इचलकरंजी महानगरपालिकेचा दुसरा वर्धापन दिन विविध कार्यक्रम व उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत दिनांक ०१ जून, २०२५ ते २९ जून, २०२५ या कालावधीत इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सदर उपक्रमाची सुरुवात इचलकरंजी महानगरपालिका, डॉ.ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी (सेन्ट्रल), (एक्झिक्युटीव्ह) व (टेक्सटाईल) यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्याने रविवार, दिनांक ०१ जून, २०२५ रोजी होणार आहे. सदर रोजगार मेळावा रा.छ. शाहू हायस्कूल येथे स. ०९.०० ते सायं. ०६.०० ये वेळेत संपन्न होणार आहे.सदर रोजगार मेळाव्यामध्ये इचलकरंजी शहर तसेच आसपासच्या परिसरातील नामांकीत कंपन्या सहभागी होणार असून वैद्यकीय, अभियांत्रिकी, शैक्षणिक क्षेत्र, हॉटेलिंग, इन्श्युरन्स, कुरियर, डिजिटल वर्क, ऑफिस वर्क, लेबर वर्क इत्यादी घटकामधील कामांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.तरी सदर रोजगार मेळाव्याचा लाभ इचलकरंजी शहर तसेच आसपासच्या परिसरातील बेरोजगार युवक युवती यांनी घ्यावा, असे आवाहन इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक श्रीमती पल्लवी पाटील, अति. आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे-कोल्हे, उपायुक्त नंदू परळकर आणि अशोक कुंभार यांनी केले आहे.
