Spread the love

सोलापूर / महान कार्य वृत्तसेवा

दक्षिण सोलापूर जिल्ह्यात एक हादरवणारा प्रकार समोर आला आहे. 9 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत सापडला आहे. या प्रकारामुळं एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर गावातील ही धक्कादायक घटना आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र पोलिस पाटलांच्या प्रथम जबाबानुसार खून झालेल्या मुलीच्या वडिलांनीच मुलीचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तशी फिर्याददेखील पोलिस पाटलांनी दिल्याचे समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात आली असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदव अहवाल आल्यानंतरच आरोपी निश्चित करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलिस स्टेशनमध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र या चिमुकलीचा मृत्यू अघोरी प्रकारातून की लैंगिक अत्याचारातून झालाय याची माहिती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र शाळकरी मुलीचा अशाप्रकारे मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.