Spread the love

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा

नागाव ता.हातकणंगले येथे सिटीझन सिंडिकेट कन्सल्टंटीच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी सिटीझन सिंडिकेटचे संचालक सुमलेश कांबळे, वैद्यकीय शिक्षणमंत्री मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अमल महाडिक, माजी आमदार राजेश पाटील, राजीव आवळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

यावेळी नागावच्या लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे, उपसरपंच सुधीर पाटील, नागावचे माजी लोकनियुक्त सरपंच अरुण माळी, वारणा कारखान्याचे संचालक सुभाष  उर्फ मामा पाटील, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, माजी उपसरपंच कृष्णात करपे, नागाव चे माजी सरपंच भिमराव खाडे, युवा नेते विजय पाटील, किरण मिठारी, लालबहादूर हौसिंग सोसायटीचे चेअरमन रणजित केळुस्कर, यांच्यासह नागाव व शिरोली गावचे आजी- माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यादाच उपमुख्यमंत्री दर्जा असलेले मंत्री नागाव मध्ये आल्याने नागरिकांनी भरपावसात सुद्धा मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. अजितदादा पवार यांचे स्वागत नागावच्या सरपंच विमल शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, त्रिमूर्ती मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यांनी केले.