मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
हवामान विभागाने सुधारित अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे. आधी मान्सून मंगळवार 27 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेली प्रणाली किती तीव होते आणि त्यामुळे वातावरणातील किती आर्दता या प्रणालीकडे खेचली जाते, यावर मान्सूनचा पुढचा प्रवास ठरेल. मात्र, अरबी समुद्रामध्ये बुधवारी चक्रीय वातस्थिती निर्माण होत आहे. यामुळे गुरुवारी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. यामुळे मुंबई, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वारे ताशी 30 ते 40 किमी. वेगाने वाहतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळ्या दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुणे घाट परिसर – गुरुवारी आणि शुक्रवारी ऑरेंज अलर्ट
अहिल्यानगर – बुधवारी ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव – बुधवारी ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर, सातारा घाट परिसर – बुधवारी, गुरुवारी ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी – बुधवार ते शुक्रवार ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग – बुधवार, गुरुवार, शनिवार ऑरेंज अलर्ट
रायगड – गुरुवारी ऑरेंज अलर्ट
