नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
भारत आणि अमेरिकेच्या विमानवाहू जहाज तंत्रज्ञान सहकार्य विषयक (अग्ीम्ीरषू ण्रीीगी ऊाम्प्हदत्दुब् ण्ददजीरूग्दह – व्ेंउअण्ऊण्) संयुक्त कार्यगटाची 8 वी बैठक 13 ते 16 मे 2025 या कालावधीत भारतात पार पडली. हा संयुक्त कार्यगट भारत आणि अमेरिकेतील संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार उपक्रमाअंतर्गत (डीटीटीआय) स्थापन करण्यात आला आहे.
या बैठकीसाठी अमेरिकेचे विमानवाहू जहाजांचे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रिअर ॲ[मिरल केसी मोटॉन यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांचे शिष्टमंडळ सहभागी झाले होते. या शिष्टमंडळाने भारताच्या दिल्ली आणि गोव्यामधील विविध संरक्षण आस्थापनांना भेट दिली.
नवी दिल्ली इथे 13 मे रोजी या संयुक्त कार्यगटाच्या बैठकीचे उद्धाटन सत्र पार पडले. नवी दिल्ली येथे झाले. भारताच्या विमानवाहू जहाज कार्यक्रमाचे सहाय्यक नियंत्रक (अण्ण्झ्) रिअर ॲडमिरल विशाल बिश्नोई हे या सत्राच्या सह अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत रिअर ॲडमिरल विशाल बिश्नोई आणि रिअर ॲडमिरल केसी मोटॉन यांनी संयुक्त कार्यगटाचे महत्त्व आणि गेल्या 10 वर्षांतील प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी विमानवाहू जहाजांसंबंधी मौल्यवान माहितीच्या आदानप्रदानासाठी संयुक्त कार्यगटाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली. विमानवाहू जहाजविषयक तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंच्या अनुषंगाने भविष्यातील परस्पर सहकार्याच्या नियोजनावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली, आणि त्यानंतर एक संयुक्त निवेदनही जारी केले केले.
या बैठकीच्या निमित्ताने गोव्यातील संरक्षण आस्थापनेत झालेल्या चर्चेत, भारतीय नौदलाच्या विमान वाहतूकविषयक तज्ज्ञांसोबत विमानवाहू जहाजांचे कामकाज आणि तंत्रज्ञानाशी संबंधित पैलूंवर व्यावसायिक पातळीवरील मुद्यांवर संवादात्मक देवाणघेवाण झाली. ही बैठक विमानवाहू जहाजविषयक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सध्या सुरू असलेल्या परस्पर सहकार्यातील एक नवा महत्त्वाचा टप्पा ठरली.
