महापालिकेने समस्यांच्या सोडवणुकीसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी
इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहरात पाणी टंचाईची समस्या पाचवीला पुजली असतानाच काही भागात पाइपलाइनला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.त्यामुळे महापालिका प्रशासनाने या समस्यांच्या सोडवणुकीसाठी ठोस पावले उचलावीत ,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न म्हणजेच शहरवासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे.शहराला चार दिवसाआड होणारा पाणी पुरवठा देखील बहुतांश परिसरात कमी दाबाने होत असल्याने पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर वळणावर पोहचली आहे.त्यातच सातत्याने पाणी पाईपलाइनला वारंवार गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.याचेच प्रत्यंतर सध्या जिम्नॅशियम मैदानच्या काॅर्नरलगत पाइपलाइनला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जाऊन येत आहे.एकीकडे शहरात पाणी टंचाईची समस्या गंभीर वळणावर असतानाच पाइपलाइन गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणी टंचाई आणि गळतीमुळे लाखो लिटर वाया जाणा-या पाण्याच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी ठोस पावले उचलावीत ,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
