मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफमध्ये धडक मारण्याकरता एक जागा शिल्लक आहे आणि त्यामध्ये मुबंई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सची कामगिरी आणि नेट रन रेट पाहता संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याचा फेव्हरेट मानला जात आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने संघात 3 मोठे बदल केले आहेत.
आयपीएल 2025 च्या स्थगितीनंतर पुन्हा स्पर्धेला सुरूवात झाली. पण अनेक खेळाडू हे आयपीएलच्या प्लेऑफसाठी संघाचा भाग नसणार आहेत. अनेक खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी माघारी परतणार आहेत. ज्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जो दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार आहे. तर दुसरीकडे इंग्लंड वि. वेस्ट इंडिज मालिका खेळण्यासाठी दोन्ही देशाचे खेळाडू खेळणार आहेत. ज्याचा मुंबई इंडियन्सला देखील फटका बसणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील आणि प्लेईंग इलेव्हनमधील तीन महत्त्वाचे खेळाडू प्लेऑफसाठी संघाचा भाग नसतील. यामध्ये विल जॅक्स, रायन रिकल्टन आणि कार्बिन बॉश यांचा समावेश आहे. विल जॅक्सची वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या ताफ्यात निवड झाली आहे. तर रायन रिकल्टन आणि कार्बिन बॉश हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आफ्रिकेच्या संघाचा भाग आहेत.
मुंबई इंडियन्सच्या संघात बदली खेळाडू म्हणून कोणाला मिळाली संधी?
मुंबई इंडियन्सने या तिघांच्या जागी तात्पुरत्या बदली खेळा.डूंची नावे जाहीर केले आहेत. मुंबईने जॉनी बेयरस्टो, रिचर्ड ग्लेसन आणि चरित असलंका यांना ताफ्यात सामील केलं आहे. बेयरस्टो हा इंग्लंडचा विकेटकिपर फलंदाज आहे, ज्याला मुंबईने 5.25 कोटींना ताफ्यात सामील केलं. तर रिचर्ड ग्लेसन हा रिकल्टनचा बदली खेळाडू आहे जो इंग्लंडचा खेळाडू आहे. ग्लेसनला 1 कोटींना मुंबईत सामील करून घेतलं आहे. तर चरिथ असलंका हा कार्बिन बॉशचा बदली म्हणून 75 लाखांना ताफ्यात सामील झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात हे तिन्ही खेळाडू प्लेऑफच्या सामन्यांसाठी ताफ्यात सामील होतील. तत्पूर्वी मुंबईला प्लेऑफकरता क्वालिफाय करायचं आहे. मुंबई इंडियन्सला प्लेऑफसाठीचा महत्त्वाचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध खेळायचा आहे. हा सामना 21 मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
