Spread the love

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी 23 रोजी इचलकरंजी दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण, तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. दौऱ्याचे चोख नियोजन करा, कशाचीही उनिव राहाणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी अशी सूचना आ. डॉ. राहूल आवाडे यांनी केली. विमानतळापासून इचलकरंजीपर्यंत रस्त्यावर चोख बंदोबस्त ठेवावा, मुख्यमंत्री येण्या मार्गावरील खड्डे भरुन घेण्यात यावेत. आदी सूचनाही आ. आवाडे यांनी बैठकीत केल्या
बैठकीस इचलकरंजी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, प्रांताधिकारी मौसमी बेर्डे-चौगुले, तसेच महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध अधिकारी उपस्थित हेोते.