Spread the love

अमरावती / महान कार्य वृत्तसेवा

तोंडात बंदुकीची नळी लावली तरी कलमा म्हणणार नाही, ‘भारत माता की जय’ हेच शेवटचे शब्द असतील, असे वक्तव्य भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. तुम्ही एका भारतीयाचा जीव घेतलात तर मोदी हजार जीव घेईपर्यंत शांत बसणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे निर्दोष भारतीय नागरिकांना धर्म विचारून त्यांची हत्या पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून करण्यात आली होती. यानंतर भारताच्या तीनही सैन्य दलाच्या जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अत्रडे नष्ट केले. भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ आणि अमरावती शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत भाजप नेत्या नवनीत राणा सहभागी झाल्या होत्या. ही रॅली राजकमल चौक येथून सुरू होऊन गांधी चौक, जवाहर गेट आणि पुढे जयस्तंभ चौक येथे आली. यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला.

नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?

यावेळी नवनीत राणा यांनी भाषण करताना म्हटले की, ‘पाकिस्तान को मालूम होना चाहिये, भारत पाकिस्तान का बाप है, और बाप रहेगा…’ मी देखील एका माजी सैनीकाची मुलगी आहे. काही लोक पहलगामवरून घरी एसीत बसून दु:ख व्यक्त करत आहे. दहशतवाद्यांनी विचारलं की, तुम्ही हिंदू आहे की मुसलमान आहे? मुसलमान आहे तर कलमा वाचा. आम्ही या देशासाठी आमचं रक्त देऊ, पण कलमा वाचणार नाही. जय श्रीरामचा नारा देऊ, तोंडात बंदुकीची नळी लावली तरी आम्ही कलमा म्हणणार नाही. फक्त भारत माता की जय हाच नारा आमच्या तोंडून निघेल. हिंदुळ्यानी पर आख भी उठाई तो तुम्हारा बाप मोदी दिल्ली मे बैठा है. एक-एक जीवाचा बदला हजारात घेईपर्यंत मोदी शांत बसणार नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. तर या रॅलीत नवनीत राणा यांच्याकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या.

नवनीत राणा यांना मिळाली होती पाकिस्तानमधून धमकी दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नवनीत राणा यांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून या धमकीविषयी सविस्तर माहिती दिली होती. पाकिस्तानहून आलेल्या कॉलमध्ये धमकी दिली गेली होती की, ”हमारे पास तुम्हारी पुरी जानकारी है, हिंदू शेरनी तू कुछ दिन की मेहमान है, तुझे खत्म कर देंगे, ना सिंदूर बचेगा ना सिंदूर लगाने वाली बचेंगी,” असे म्हटले गेले होते. तर अशाच प्रकारचे कॉल त्यांचे पती रवी राणा यांच्या मोबाईलवर देखील आल्याची माहिती समोर आली होती. या संपूर्ण प्रकरणाची नोंद खार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस तपास सुरू आहे.