Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

काश्मीर आपले आहे.काश्मीर हे कालही आपले होते आणि आज पण आपलं आहे उद्याही आपलं राहील, असे विधान उद्धव ठाकरेंनी केलंय.

आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्‌‍भूमीवर ठाकरे गटाची तयारी सुरुय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना भवनमध्ये नुकतीच बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्‌‍वभूमीवर ठाकरे गटातील नेत्यांना महाराष्ट्रभर दौरा करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेयत.

स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शिवसेना भवन येथे अहवाल सादर करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. बैठकीत प्रत्येक नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्‌‍वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्याची जबाबदारी देऊन आढावा देण्यात येणार आहे. एकवेळ देशात भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलं राहील, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

संकट आलं तर पंतप्रधानांसोबत

आपला वैचारिक विरोध असेल पण देशावर काही संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्यासोबत असू, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही देशाच्या विरोधात नाही पण सरकारच्या विरोधात आहोत.

वन नेशन वन इलेक्शनचा अभ्यास सुरु

वन नेशन वन इलेक्शनचा अभ्यास सुरु आहे. कमिटी महाराष्ट्रात आहे पण निवडणूक ही पारदर्शकपणे घ्या. वन नेशन वन इलेक्शन करतायत ते ठीक आहे पण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी प्रचारात उतरू नये.हेही ठरवा, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

अमित शहा हे 3 पक्षांचे प्रमुख

आमचे जहाज बुडणारे नाही.तर भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज हे बुडणारे आहे, असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी लगावला. अमित शहा हे 3 पक्षांचे प्रमुख आहेत. ते अजित पवार आणि शिंदेंच्या पक्षाचेही प्रमुख आहेत. सत्ता येते व जाते. सत्ता आल्यावर हुरळून जायचे नाही व सत्ता गेल्यावर दु:ख नाही करायचे. परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट,प्रयत्न करायचे, असेही यावेळी ठाकरे म्हणाले.