Spread the love

मसूदच्या कुटुंबाला 14 कोटी रुपयांची मदत : पुन्हा दहशतवादी छावण्याही उभारणार

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा आणखी एक प्रताप उघडकीस आलाय. पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत केलेल्या हल्ल्यात मसूद अजहरच्या जैश ए मोहम्मदचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्‌‍वस्त केलं. आता पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारनं ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झालेल्या दहशतवादी अड्ड्यांचे पुर्नवसन करण्याची घोषणा केलीय. त्यासोबतच मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई दिली जाईल व जखमींना 10 लाख ते 20 लाख पाकिस्तानी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या घोषणेमुळे पाकिस्तानचे वास्तव संपूर्ण जगासमोर आले आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्ताननं आता कोणत्याही थराला जाण्यास सुरुवात केलीय. पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मोठी पोस्ट केली असून दहशतवाद्यांना भरपाई आणि दहशतवाद्यांना लपणाच्या ठिकाणांची पुर्नबांधणी करण्यात आलीय. 6 व 7 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले. ज्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्‌‍वस्त केले.यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवादी छावण्यांचा समावेश आहे. या दहशतवादी अड्ड्यांमध्ये भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती.

मसूद अझहरच्या कुटुंबियांना 14 कोटींची मदत

ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 दहशतवादी मारले गेले आहेत, त्यामुळे पाकिस्तान सरकार त्याच्या कुटुंबाला 14 कोटी रुपये भरपाई म्हणून देणार आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी घरे बांधणे आणि त्यांच्या मुलांची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार ही जबाबदारी पार पाडेल, असे पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणतात. सर्व जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल. शाहबाज शरीफ ज्या लोकांबद्दल बोलत आहेत, ते सर्व दहशतवादी होते, जे भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत होते.

दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट झाल्यानंतर, घाबरलेल्या पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु येथेही त्यांना पराभव पत्करावा लागला. भारताने त्यांच्या हल्ल्यांना अशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले की त्यांनी त्यांच्या संरक्षण यंत्रणा उडवून दिल्या आणि त्यांची ताकद मानणारी क्षेपणास्त्रे नष्ट केली. या हल्ल्यांमध्ये 11 पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेले आणि 78 जण जखमी झाले, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

प्राण गमावलेल्या पाक लष्कराच्या जवानांना…

शाहबाज शरीफ सरकार प्राण गमावलेल्या पाक लष्कराच्या जवानांना  1ते 1.8 कोटी पाकिस्तानी रुपयांची भरपाई देईल. सैनिकांच्या कुटुंबियांना त्यांच्या पदानुसार ही भरपाई दिली जाईल आणि त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत पूर्ण वेतन आणि निर्वाह भत्ता दिला जाईल. अशी घोषणा केलीय. पाकिस्तान सरकार म्हणते की ते सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलेल आणि प्रत्येक सैनिकाच्या एका मुलीच्या लग्नासाठी 10 लाख पाकिस्तानी रुपये आर्थिक मदत म्हणून देईल. जखमी सैनिकांना 20 ते 50 लाख पाकिस्तानी रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.  ती देखील सैनिकांच्या दर्जाच्या आधारावर दिली जाईल. ज्या सैनिकांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरांसाठी 1.9 ते 4.2 कोटी रुपये दिले जातील.