Spread the love

पेठ वडगाव / महान कार्य वृत्तसेवा

येथील वडगांव हॉकी अकॅडमी व श्री.बळवंतराव यादव हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजची हॉकी खेळाडू वैष्णवी खंदारे हिची राजगीर बिहार येथे होणाऱ्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघामध्ये गोलकीपर म्हणून निवड झाली आहे. तिने आतापर्यंत शालेय तसेच सब ज्युनिअर व ज्युनिअर राष्ट्रीय ऑफिस स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिच्या निवडीने पेटवडगाव येथील हॉकी खेळाडूंनी फटाक्यांच्या आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

तिला शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, सचिव सौ. विद्या पोळ ताईसाहेब, कार्यवाह श्री. अभिजीत गायकवाड दादा, मुख्याध्यापक अविनाश पाटील, उपमुख्याध्यापिका सौ.एम.आर. पोळ, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनोज भोरे, हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सौ. सुरेखा पाटील, सचिव मोहन मांडवले यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच क्रीडा मार्गदर्शक  व बळवंतराव यादव स्कूलचे पर्यवेक्षक संताजी भोसले सर, हॉकी प्रशिक्षक राहुल गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.