ऑपरेशन सिंदूरवर सानिया मिर्झाची बेधडक पोस्ट
दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील दोन महिला अधिकाऱ्यांच्या सहभागाबद्दल सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिसी यांच्यासमवेत ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी माहिती दिली होती. सानिया मिर्झा हिने दोन महिला अधिकाऱ्यांचा पत्रकार परिषद घेतानाचा फोटो शेअर केलाय. सानिया मिर्झा हिने या पोस्टला शेअर करून महिला अधिकाऱ्यांच्या योगदानाचे समर्थन केले. सानिया म्हणाली, हा फोटो परफेक्ट आहे, आपण देश म्हणून काय आहोत हे दाखवणारा आहे..
‘ऑपरेशन सिंदूर’ हे 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्तपणे केलेले कारवाई आहे. या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर लक्ष्य करून ही कारवाई केली.
ऑपरेशन सिंदूर राबवण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका
या कारवाईत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिसी यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत सहभागी होऊन कारवाईची माहिती दिली. सानिया मिर्झा यांनी या दोन महिला अधिकाऱ्यांच्या विविध धार्मिक पार्श्वभूमी असूनही एकत्र येऊन देशसेवेसाठी योगदान दिल्याचे कौतुक केले.
सानिया मिर्झा भारताच्या सर्वोत्कृष्ट टेनिसपटूंपैकी एक आहे. तिने सहा ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवले असून, 2015 मध्ये जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीत प्रथम क्रमांक पटकावला होता.
भारत पाक सीमेवर तणाव वाढला
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने या कारवाईला ‘युद्धाची कृती’ म्हणून संबोधले असून, भारताने ही कारवाई दहशतवादी (रिहरश्रसरा ींशेीीी रीींंरलज्ञ) हल्ल्याच्या प्रत्युत्तरात केली असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, सानिया मिर्झा हिने पोस्टच्या माध्यमातून राष्ट्रीय एकतेचं आणि महिलांच्या सहभागाचे कौतुक केले आहे.
