Spread the love

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
आपल्यापैकी बरेच जण कोरनाचा कहर पूर्णपणे विसरले नाहीत. एवढ्यातच आता आणखी एक नवा साथीच आजार येण्याची चर्चा सुरु झाली आहे. चीनमधील संशोधकांनी वटवाघुळांवरील नवीन कोरोना सारखा व्हायसर शोधून काढला आहे. यामुळे जगभरात चिंता वाढली आहे. संशोधकांना hKU5-COV2 हा एक नवीन विषाणू आढळून आला आहे. जो कोविड-19 इतकाच धोकादायक असू शकतो.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, hKU5-CoV-2 विषाणू हा कोविड-19 साठी जबाबदार असलेल्या SARS-CoV-2 ने वापरलेल्या मानवी रिसेप्टर (ACE2) चा वापर करतो. ‘बॅट वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विषाणूशास्त्रज्ञ शी झेंगली यांनी हा शोध लावला आहे. या नवीन शोधापूर्वी, चीनमध्ये मानवी मेटाप्न्यूमोव्हायरस (hMPV) च्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. त्यानंतर कोविडसारख्या साथीच्या आजाराची भीती सतावू लागली आहे.
विषाणू किती धोकादायक आहे?
hKU5-CoV-2 विषाणू वटवाघळांमध्ये आढळला आहे, परंतु शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की तो इतर प्राण्यांद्वारे मानवांमध्ये देखील पसरू शकतो. हा विषाणू MERS विषाणूच्या कुटुंबातील आहे. जे पूर्वीच धोकादायक ठरले होते. या विषाणूच्या मानवी पेशींना जोडण्याच्या क्षमतेबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. परंतु ते मानवांमध्ये किती वेगाने पसरू शकते हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
विषाणूबद्दल आपल्याला किती सतर्क राहण्याची गरज आहे?
या विषाणूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांचा, ग्वांगझू प्रयोगशाळा, ग्वांगझू अकादमी ऑफ सायन्सेस, वुहान विद्यापीठ आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचा अहवाल ‘सेल’ नावाच्या जर्नमध्ये प्रकाशित झाला आहे. शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की hKU5-CoV-2 मानवांना संक्रमित करू शकतो. सध्या यावर आणखी (नवीन साथीचा रोग) अधिक संशोधन करण्याची गरज आहे. या नवीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता वाढवण्याची गरज आहे.