मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. आता प्रत्येक गावात एका सेवकाची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. ते हिंगोलीत बोलत होते. नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावात येणारी अडचण सांगायला हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी गावात एक मुलगा द्यावा लागेल असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
22 फेब्रुवारी ते 22 मार्च आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आपण एक आलो तर राहिलेले आरक्षण पण मिळेल असे मनोज जरांगे म्हणाले. नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावात येणारी अडचण सांगायला हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात एक सेवक द्यावा लागणार आहे. त्याला संपूर्ण गाव अडचणी सांगेल असे जरांगे पाटील म्हणाले. त्यासाठी एक महिना आपण ते काम करत आहोत.
आरक्षण मिळालं असं ग्राह्य धरा ते मिळणार आहे
आरक्षण मिळालं असं ग्राह्य धरा ते मिळणार आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आपल्याला आपले मूळ व्यवसायकडे वळवायचे आहे, त्यासाठी आपण काम करतोय. लाखात कोटीत समाज एकत्र आला. मात्र आपण गरिबांसाठी काम करु शकलो नाही तर आपण एकत्र येऊन फायदा नाही असे मनोज जरांगे म्हणाले.
