एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकानंतर महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे .महापालिकेत स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यानंतर नांदेड भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये ठिणग्या पडत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. दरम्यान, आज ( 6 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड शहरात आभार सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेपूर्वीच शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी पुन्हा एकदा भाजप खासदार अशोक चव्हाणांवर टिकेचे बाण सोडले आहेत.
‘अशोक चव्हाण मोठे नेते त्यांनी युतीधर्म पाळला पाहिजे .युती केल्यावर हातात हात घालून चालले पाहिजे. क्लेष विसरले पाहिजेत. मात्र विधानसभेत बंडखोरी केलेल्या लोकांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं त्यांना सहा दिवसात पक्षात घेतलं .अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात स्वत:चा गट निर्माण केला होता भाजपमध्येही तसाच गट निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाणांवर केला. महायुतीत नीट संवाद साधणार नसाल तर महायुतीत मिठाचा खडा पडेल असा सूचक इशारा हेमंत पाटलांनी दिला.
काय म्हणाले हेमंत पाटील ?
नांदेड शहरात अशोक चव्हाण यांची मोनोपोली आहे .अधिकारी नियुक्तीतही ते मोनोपोली करतात असा शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केला. महायुतीत नीट संवाद साधणार नसाल तर महायुतीत मिठाचा खडा पडेल असे इशाराही हेमंत पाटलांनी दिला .ते म्हणाले, ‘चव्हाण साहेब मोठे नेते आहेत .त्यांनी युतीधर्म पाळला पाहिजे .काँग्रेस पक्षात त्यांनी स्वत:चा गट निर्माण केला होता .भाजपमध्येही त्यांचा तसाच गट निर्माण करायचा प्रयत्न आहे .अशोक चव्हाण यांना योग्य समज द्यावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसन कडे तक्रार केली होती .आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही माहिती देणार आहे .युती केल्यावर हातात हात घालून चालले पाहिजे .क्लेश विसरले पाहिजेत .मात्र विधानसभेत बंडखोरी केलेल्या लोकांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं .यांना सहा दिवसातच पक्षात घेतलं .युती म्हणून लढल्यानंतर बंडखोरी केलेल्यांना पक्षात पावन करून घेतलं जात आहे .त्यामुळे शिवसैनिकात चीड आहे .विधानसभा निकालानंतर आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदेंची आज जालन्यापाठोपाठ नांदेडमध्ये आभार यात्रा आहे .या सभेपूर्वीच हेमंत पाटलांनी अशोक चव्हाण यांवर टीकेचे बाण सोडले आहेत .
महायुतीत चढाओढ, हेमंत पाटलांनी अशोक चव्हाणांना घेरले
गेल्या काही दिवसांपूर्वीच हेमंत पाटील यांनी अशोकाचे झाड हे दिसायला उंच आणि हिरवेगार असते पण बारा वाजता त्याची सावली केवळ स्वत:ला मिळते .इतरांना नासावली ना फळ असं म्हणत नाव न घेता बोचरी टीका केली होती .अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही .युती धर्माची त्यांना फारशी माहिती नाही , असेही ते त्यानंतर काही दिवसांनी म्हणाले होते .आताही हेमंत पाटलांनी अशोक चव्हाण यांना घेरल्याचे दिसून आले .