Spread the love

सदावर्तेंच्या मुलीची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
वकील गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार केली आहे. ”महिलांनी स्कर्ट, शॉर्ट घालून सिद्धिविनायक मंदिरात येऊ नये, असे म्हणणे महिलांसोबत अन्याय आहे. संविधानाच्या तरतुदींची पायमल्ली आहे”, असे झेन सदावर्ते हिने तक्रारीत नमूद केलं आहे.
झेन सदावर्ते तक्रारीत काय काय म्हणाली?
मी झेन सदावर्ते 12 वीत शिकत असून नॅशनल बेवरी अवार्डची विजेती आहे. सिद्धिविनायक मंदिरात महिलांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. भक्तांवर लादण्यात आलेला हा ड्रेस कोड सामाजिकदृष्ट्या चुकीचा आणि भेदभाव करणारा आहे, असं माझं मत आहे. सिद्धिविनायक मंदिरात लागू करण्यात आलेला ड्रेस कोड मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. शिवाय, भारतासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आणि लोकशाही असलेल्या देशात सर्व नागरिकांना त्यांच्या श्रद्धांचे पालन करण्याची परवानगी असणे, आवश्यक आहे. कपडे घालण्यावरुन सार्वजनिक, धार्मिक ठिकाणी भेदभाव करणे चुकीचे आहे. भक्तांनी त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा का घालाव्यात?श्रद्धेचा गाभा भक्तीमध्ये आहे, परिधान केलेल्या कपड्यात नाही. मी नमपणे विनंती करते की, ड्रेस कोडच्या नियमांचा पुन्हा एकदा विचार करण्यात यावा. मंदिर प्रशासनाने भेदभाव करणाऱ्या या नियमांबाबत सुधारणा केली पाहिजे.