Spread the love

.. तरीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भेटणार; दमानिया पुरावे देणार

बीड/महान कार्य वृत्तसेवा
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा आहे. तरीही मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मी त्यांना भेटणार आणि पुरावे देणार असल्याचे वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलं. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली असल्याचीही माहितीही दमानिया यांनी दिली. संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे.
भष्टाचाराविरुद्ध मरेपर्यंत लढत राहणार
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा आहे, त्यांच्या भष्टाचारा विरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन. पण बीडचे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. अशा हैवाण लोकांना थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंर्त्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना? असा सवाल देखील दमानिया यांनी केला आहे.
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे व्यवहार एकत्र
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत. त्यांचे व्यवहार कसे एकत्र आहेत. धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे महाजनकोशी कसे व्यवहार करत आहेत हे पुरावे दाखवण्यासाठी वेळ मागितली असल्याचे दमानिया म्हणाल्या.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी झाली होती हत्या
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. तसेच राज्यातील विविध ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे देखील निघाले होते. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती वाल्मिक कराड हेच सुत्रधान असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असी मागणी केली जात आहे.