नाशिक/महान कार्य वृत्तसेवा
बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह अन्य आरोपी अटकेत आहेत. वाल्मिक कराड आणि इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर, दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर वाल्मिक कराडवर सातत्याने आरोप सुरू होते. वाल्मिक कराड हाच परळीतील सत्ता केंद्र असल्याचा आरोप करण्यात येत होता.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक आरोप आणि गौप्यस्फोट झाले. वाल्मिक कराडचे खंडणीचे रॅकेट आणि त्याच्यावर असलेल्या राजकीय वरदहस्तवर चर्चा रंगू लागली. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो. विरोधकांनी अनेक आरोपही केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यानंतर भूमाता बिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
तृप्ती देसाई यांनी म्हटले की, कराडचे जाळे हे बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. वाल्मिक कराडचे निकटवर्तीय, मर्जीतील पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणावर असून देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे करण्याची मागणी त्यांनी केली. तृप्ती देसाई यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली असून या पोलिसांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.
तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर एक यादी शेअर करत कराडच्या मर्जीतील पोलिसांची ही नावे असल्याचा दावा केला आहे. गृहमंत्रालयानेदेखील यातील नावांची चौकशी करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
- बाळराजे दराडे बीड ग्रामीण-API
- रंगनाथ जगताप, अंबाजोगाई ग्रामीण -API
- भागवत शेलार, केज बीट – LCB
- संजय राठोड, अंबाजोगाई – additional Police
- त्रिंबक चोपने, केज -Police
- बन्सोड, केज -API
- कागने सतिश, अंबाजोगाई – Police
- दहिफळे, शिरसाळा-API
- सचिन सानप, परळी बिट – LCB
- राजाभाऊ ओताडे, बीड -LCB
- बांगर बाबासाहेब, केज -POLICE
- विष्णु फड, परळी शहर – Police
- प्रविण बांगर, गेवराई-PI
- अमोल गायकवाड, युसुफवडगाव ड्रायवर Police
- राजकुमार मुंडे, अंबाजोगाई DYSP ऑफिस- police
- शेख जमिर, धारूर- Police
- चोवले, बर्दापुर – Police
- रवि केंद्रे, अंबाजोगाई- police
- बापु राऊत, अंबाजोगाई – Police
- केंद्रे भास्कर, परळी – Police
- दिलीप गित्ते, केज DYSP ऑफिस- Police
- डापकर- DYSP ऑफिस केज – Police
- भताने गोविंद, परळी -police .
- विलास खरात, वडवणी – Police.
- बाला डाकने, नेकनुर – Police
- घुगे, पिंपळनेर -API
वाल्मिक बीडचा सरपंच संतोष देशमुख खंडणी प्रकणातील आरोपी आहे. त्याच्याविरोधात खंडणी आणि मकोका अंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे त्याला 180 दिवस जामीन मिळणार नाही. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले यांनी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं. 29 नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आला होता. त्याच्यासोबत सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले देखील असल्याचं दिसत होतं.