Spread the love

‘या’ 13 क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी जरा संभाळून!

दिल्ली/ महान कार्य वृत्तसेवा
भारतात बहुतांशजण नोकरी करतात. जगभरात आर्टिफिशिल इंटेलिजन्सने शिरकाव केलाय. त्यामुळे अनेक गोष्टी जशा सोप्या झाल्यायत त्याप्रमाणे अनेकांच्या नोकरीवर गदा देखील आली आहे. वर्ल्‌‍ड इकॉनॉमिक फोरमच्या ‘फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025’ मध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2030 पर्यंत जगात 170 दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण होतील. असे असताना त्यासोबतच सुमारे 92 दशलक्ष नोकऱ्याही जातील, असे ‘फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025’ मध्ये म्हटले आहे. जगभरात वेगाने होणारी तांत्रिक प्रगती, डिजिटल परिवर्तन आणि हरित अर्थव्यवस्थेकडे जगाची वाटचाल यामुळे हे बदल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या कौशल्यांची मागणी हळूहळू कमी होईल आणि तांत्रिक कौशल्ये शिकणे अनिवार्य होईल, असे या रिपोर्टमधून स्पष्ट होतंय. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि स्वत:ला सतत अपडेट ठेवणे हाच भविष्यात नोकरीच्या संधी सुरक्षित करण्याचा एकमेव मार्ग आहे.
वर्ल्‌‍ड इकॉनॉमिक फोरम अहवालानुसार, डिजिटल प्रवेशाचा विस्तार हा सर्वात परिवर्तनकारी ट्रेंड असेल. यामुळे 2030 पर्यंत आमच्या व्यवसायात मोठे बदल घडतील असे जवळपास नोकऱ्या देणाऱ्या 60 टक्के जणांना वाटते. तांत्रिक प्रगतीचा रोजगार बाजारपेठेवर खोलवर परिणाम होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि बिग डेटा (86म), रोबोटिक्स आणि ऑटोमेशन (58म) आणि ऊर्जा निर्मिती, साठवणूक आणि वितरण (41म) यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन घडून येईल, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. एकीकडे या क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्या निर्माण होतील तर दुसरीकडे अनेक पारंपारिक नोकऱ्या नष्ट होतील, असे सूचक विधानही यातून करण्यात आले आहे.
भारतावर काय परिणाम?
भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत हा बदल आणखी स्पष्टपणे दिसून येईल. डिजिटल इंडिया आणि हरित ऊर्जा प्रकल्पांमुळे आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन नोकऱ्यांचा विस्तार होईल, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हे होत असताना डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रिंटिंग उद्योगातील कामगारांसारख्या पारंपारिक नोकऱ्या गमावल्या जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. येत्या दशकात पुढील क्षेत्रांमध्ये वेगाने नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे.
पोस्टल सर्व्हिस लिपिक
बँक टेलर आणि संबंधित क्लर्क
डेटा एन्ट्री ऑपरेटर
कॅशियर आणि तिकीट क्लार्क
प्रशासकीय सहाय्यक आणि कार्यकारी सचिव
छपाई आणि संबंधित व्यापार कामगार
अकाउंटिंग, बुककीपिंग आणि पेरोल क्लर्क
स्टॉक-कीपिंग आणि मटेरियल रेकॉर्डिंग लिपिक
ट्रान्सपोर्टेशन अटेंडंट आणि वाहक
डोअर टू डोअर सेल्स वर्कर आणि न्यूज वेंडर
ग्राफिक डिझायनर्स
क्लेम ॲडजेस्टर आणि इन्व्हेस्टिगेटर्स
लीगल ऑफिसर्स
टेलिमार्केटर्स

नोकऱ्यांच्या मार्केटमध्ये बदल आणि कौशल्यांची गरज
2025 ते 2030 दरम्यान नोकऱ्यांच्या मार्केटमध्ये एकूण नोकऱ्यांपैकी 22म बदल दिसून येईल. ज्यामुळे 78 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होतील, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 2030 पर्यंत जॉब मार्केटमध्ये 39म प्रमुख कौशल्ये बदलतील. म्हणूनच नोकरी देणारे आता सतत नवीन कौशल्ये शिकणे आणि जुनी कौशल्ये अपडेट करणे यावर भर देत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.