भंडारा/महान कार्य वृत्तसेवा
आयुध निर्माण कंपनीतील सी सेक्सनमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीतील सी सेक्सनमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कंपनीत दारू गोळा तयार केला जात होता.
स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीनं स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जवाहरनगरातील आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाला आहे. ऑर्डिन्स फॅक्ट्रित स्फोट झाल्यानंतर परिसरात आग आणि धुराचे लोळ दूरपर्यंत दिसत होते.
हा स्फोट खूप भयानक होता. स्फोटाचा आवाज 5-7 किलोमीटर दूरवर गेल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरुन स्फोटाची भीषणता किती असेल याचा अंदाज लावू शकतो. सी सेक्शनमधील 23 नंबरच्या इमारतीमध्ये हा स्फोट झाला आहे. साधारपणे 11 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येतंय मात्र याची माहिती उशिरा मिळाली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यास थोडा उशीर झाला.
सकाळी 11 वाजता स्फोट झाला. त्यामुळे बरेच कामगार तिथे काम करत होते. त्याच वेळी हा स्फोट झाला. या स्फोटाचं कारण अद्याप समोर आलं नाही. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 7 जण जखमी तर आठ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. स्फोटाचे आवाज झाल्यानं नागरिक भयभीत झाले. नेमकं काय घडलं हे बघायला बघ्यांची गर्दी या कंपनीबाहेर झाली आहे.