कराड/ महान कार्य वृत्तसेवा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा आणि वाल्मिक कराडांच्या खंडणीचा संबंध असल्याप्रकरणी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडने जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे . वाल्मीक कराडच्या खंडणी प्रकरणात केलेल्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार होती .मात्र जामीन अर्ज मागे घेतल्यामुळे ही सुनावणी होऊ शकलेली नाही. दरम्यान काल रात्री (22 जानेवारी) वाल्मीक कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज अचानक जामीन अर्ज ही मागे घेण्यात आला . या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणेकडून चार्जशीट दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली .
वाल्मिक कराडवर उपचार सुरु
दरम्यान वाल्मीक कराड याला काल रात्री (22 जानेवारी) पोटात दुखत असल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं .सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये वाल्मीक कराडवर उपचार सुरू आहेत. वाल्मिक कराडची सोनोग्राफी करण्यात आली .मधुमेह तसेच रक्तदाबाची तपासणीही बुधवारी रात्री (22 जानेवारी) करण्यात आली होती . पावणे बाराच्या सुमारास वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहातून बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता बीडच्या शासकीय रुगणालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मकोका अंतर्गत वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने किमान 180 दिवस वाल्मिक कराडला जामीन मिळू शकत नाही. 7 दिवसांची कोठडी संपल्यामुळे काल (22 जानेवारी)वाल्मिक कराडला बीडच्या विशेष सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते . यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत वाल्मिक कराडला 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीची शिक्षा न्यायालयाने सुनावली .खंडणी प्रकरणातील गुन्हे लागलेल्या वाल्मीक कराडने खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज आज मागे घेतलाय .या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणे कडून चार्जशीट दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा जामीन अर्ज केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय . दरम्यान न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील जामिनासाठी कोर्टात गेले होते . पण नको का अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपीला जामीन मिळत नाही . त्यामुळे आता पुढचे 6 महिने वाल्मिक कराडला जेलमध्येच राहावं लागणार आहे .संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी वाल्मिक कराडची गरज भासेल,त्यावेळी कोर्टाच्या परवानगीने वाल्मिक कराडची चौकशी सीआयडी करू शकते.