विश्वास संपादन करुन खरेदी केलेल्या 1 कोटी 18 लाख 64 हजार 235 रुपयांच्या ग्रे कापड खरेदीतील 89 लाख 18 हजार 734 रुपयांची संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी पाली-राजस्थान येथील तिघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रेखा कुशल सुराना (वय 45), कुशल सुराना (वय 48) आणि खेतु मुलचंद खांतेड (वय 32) अशी त्यांची नांवे आहेत. यापैकी कुशल सुराना व खेतु खांतेड या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने राजस्थान येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी विकास बंशीधर दोसी (वय 40 रा. भिवंडी जि. ठाणे) यांनी तक्रार दिली आहे.