नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
वूमन्स टीम इंडियाने अंतिम सामन्यात शेजारी नेपाळवर मात करत पहिला वहिला खो खो वर्ल्ड कप जिंकला आहे. भारतीय महिला संघाने पहिला वहिला खो खो वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाने नेपाळवर अंतिम सामन्यात मात करत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नवी दिल्लीत रविवारी 19 जानेवारीला हा महाअंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने नेपाळवर 38 पॉइंट्सच्या फरकाने नेपाळचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने या स्पर्धेत सलामीच्या सामन्यापासून धमाकेदार कामगिरी सुरु ठेवली होती. टीम इंडिया तशीच कामगिरी अंतिम सामन्यातही केली नेपाळला 78-40 अशा फरकाने पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. महिला खो खो वर्ल्ड कप स्पर्धेला 13 जानेवारीपासून इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरुवात झाली. टीम इंडियाने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 176 पॉइंट्सच्या मोठ्या फरकाने धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. टीम इंडियाने त्यानंतर अशीच कामगिरी अंतिम सामन्यापर्यंत सुरु ठेवली आणि वर्ल्ड कप जिंकला.