Spread the love

पटणा/महान कार्य वृत्तसेवा
बिहार पोलिसांनी एका अनोख्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये अपत्यहीन महिलांना गरोदर करण्याच्या बदल्यात 5 लाख रुपये पुरुषांना देण्याचे आमिष दाखवण्यात आले आहे. शुक्रवारी पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. नवादा जिल्ह्यातून प्रिन्स राज, भोला कुमार आण राहुल कुमार यांना अटक करण्यात आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब आणि प्लेबॉय सर्व्‌ि‍हस यांसराख्या कार्यक्रमांच्या नावाखाली फसवणूक करणारे, लोकांना फोन करून आमिष दाखवून पैसे उकळत होते. या टोळीने भारतातील अनेक राज्यांमध्ये अनेकांची फसवणूक केली आहे. आतापर्यंत फसवणूक झालेल्यांची संख्या जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारे वेगवेगळ्या राज्यातील लोकांना फोन करून किंवा व्हॉटस्ॲप करून संवाद साधत होते. ज्या स्त्रियांना मूल होत नाही, त्यांना यशस्वीरित्या गर्भधारणा करण्याचं करण्याचं आमिष दाखवले जाते. प्रक्रिया अयशस्वी झाल्यास अतिरिक्त 50 हजार रुपये देण्याचे खोटं आश्वासनही देण्यात आले होते. परंतु, यासाठी आधी त्यांना पाच लाख रुपये भरावे लागत होते.
पीडितांनी स्वारस्य दाखवल्यानंतर ही टोळी 500 रुपयांपासून 20 हजारांपर्यांत ऑनलाईन नोंदणी शुल्काची मागणी करत होती. दरम्यान अटक करण्यात आलेल्यांकडून पोलिसांनी सहा स्मार्टफोन जप्त केले आहे. कॉल लॉग्स, व्हॉट्‌‍सॲप फोटो, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि व्यवहार तपशीलांसह दोषी पुरावे जप्त केल्यानंतर पोलिसांनी टोळीच्या संपूर्ण नेटवर्कचे मॅपिंग सुरू केले आहे.