मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
शेअर मार्केटमध्ये सोमवार नंतर पुन्हा एकदा हादरा बसला आहे. गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. बँकिंग सेक्टरला याचा खूप मोठा फटका बसला आहे. शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी 170 अंकांनी घसरला. बाजारातील या घसरणीदरम्यान, अदानी पोर्ट्स, टायटन, झोमॅटो शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 630 अंकांची मोठी घसरण बुधवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक कोसळले.
बुधवारी शेअर बाजारात अचानक झालेल्या या मोठ्या घसरणीत अदानीपासून टाटापर्यंतचे शेअर्स कोसळले. लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गौतम अदानी यांची कंपनी अदानी पोर्ट्स सर्वाधिक घसरलेल्या 10 समभागांमध्ये होती. अदानी पोर्ट्स शेअर 2.76म च्या घसरणीसह व्यापार करत होता तर टाटा समूह कंपनी टायटनचा शेअर देखील 3म च्या घसरणीसह व्यापर करत होते.
NTPC, Tata Motors, Infosys, ICICI Bank, HCL Tech, BHEL, Tata ElXsi, Aarti Industries, Biocon, GoDigit, Voltas, Lupin, Policy Bazar, या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं असून आता येत्या काळात पैसे ठेवावेत की काढावेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.