Spread the love

पुणे/महान कार्य वृत्तसेवा
चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू आहे. राज्यात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाने रविवारी स्पष्ट केले. दरम्यान, एचएमपीव्हीबाबत दक्षतेसह सर्दी-खोकल्याच्या रुग्णांच्या सर्वेक्षणाचे पाऊल आरोग्य विभागाने उचलले आहे.
आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर म्हणाले, ‘मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) श्वसन संसर्गास कारणीभूत ठरतो. हा विषाणू पहिल्यांदा नेदरलँडसमध्ये 2001 मध्ये आढळला. हा एक सामान्य श्वसन विषाणू असून, तो श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी साथरोग आहे आणि फ्ल्यूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. राज्यात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.’
एचएमपीव्हीचा धोका वाढल्याने आरोग्य विभागाने राज्यातील श्वसन संसर्गाच्या आकडेवारीचे वेिषण केले आहे. राज्यात 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये श्वसन संसर्गात कोणतीही वाढ झालेली दिसून आलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी श्वसनविकाराच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
हे करा
खोकताना, िशंकताना तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
साबण, पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या.
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन ठेवा.
हे करू नका
हस्तांदोलन
टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
आजारी लोकांशी जवळचा संपर्क
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे चीनमध्ये एचएमपीव्ही साथरोगाचा संसगर् सुरू असून, त्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. या पार्श्‌‍वभूमीवर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करून सर्दी-खोकला रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करावेत.

डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, आरोग्य सेवा