गंभीर आजारांवर मोफत उपचारासाठी प्रयत्न : रवींद्र माने
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ हिरक आरोग्य वर्ष उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला. शिवसेना महिला आघाडीच्यावतीने हे शिबिर आयोजीत केले होते. यात सुमारे 500 रूग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीत गंभीर लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी सांगितले.
एकनाथ हिरक आरोग्य वर्ष उपक्रमांतर्गत शिवसेना महिला आघाडी व अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सांगली रोड वसुंधरा पब्लिक स्कूल येथे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त वसंतराव माने, डॉ.कित्तुरे, जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी शिबिरात तपासणीस येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्याच्या सुचना डॉक्टरांना दिल्या. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये हृदय विकार, मुत्र रोग, नेत्र रोग, अस्थिरोग आदी रोगांवर मोफत तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या मातोश्री इंदुमती माने, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वैशालीताई डोंगरे, युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनीताई शिंत्रे, तज्ज्ञ डॉ.आयेशा राऊत, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, शहर प्रमुख भाऊसो आवळे, इकबाल कलावंत, माजी आरोग्य सभापती रविंद्र लोहार, उपशहरप्रमुख सुशील खैरमोडे, जिल्हा संघटक मोहन मालवणकर, तरु कमिटी सदस्य ज्योतिराम बरगे, संदीप माने, महिला आघाडी शहरप्रमुख स्नेहांकिता भंडारे, शहरप्रमुख रुपालीताई चव्हाण, उपशहरप्रमुख दिपाताई देसाई, उपशहरप्रमुख मिनाताई भिसे, उपशहरप्रमुख दिप्ती भोकरे, रेखाताई बिरंजे, विभागप्रमुख शंकुतला पाटील, विद्याताई जाधव, सोनाली आडेकर, वैशाली शिंदे, सरिता पांडव, शितल जाधव, विलासकाका माने, सुरेश नेगांधी, किशोर उरुणकर, विनायक काळे, संताजी जाधव, हेमंत कांबळे, रमेश काळे, दीपक जगताप, अमित शिरगुरे, लखन कांबळे, ऋतुराज शिंत्रे, ओंकार घोरपडे, अभिजित डुब्बल, शिवसेना पदाधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.