मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
”वाल्मिक कराडला जी गाडी घेऊन आली ती ताब्यात का घेतली नाही? जो त्याला गाडीमध्ये घेऊन आला त्याला ताब्यात का नाही घेतले? एवढ्या दिवसांमध्ये ते कोणा कोणाला भेटले कोणी कोणी त्यांना मदत केली त्या सगळ्यांना सहआरोपी करा. एसआयटी लावली पण त्यातले अधिकारी कोण आहेत? त्यांना खुर्चीवर कोणी बसवलेय हे पण तपासा. सालगडी असणारे अधिकारी एसआयटीमध्ये नेमण्यात आले आहेत”, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते, खासदार बजरंग सोनवणे म्हणाले. ते पुण्यातील आंदोलनात बोलत होते.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे; बजरंग सोनवणे
बजरंग सोनवणे म्हणाले, नऊ तारखेला अपहरण करून संतोष देशमुख यांच्या हत्या केली. हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा जातीचा नाही तर मानवतावादी आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. सरकारला जोपर्यंत फाशी द्यायची सद्बुद्धी देत नाही तोपर्यंत मोर्चे सुरू राहणार..बीडमध्ये आता जीवन जगणं मुश्किल झाल आहे.वाल्याचा वाल्मिक झाला पण याचा आणि अलीबाबा चाळीस चोर झालाय.
हत्यामागे जो मास्टरमाईंड आहे, त्याला पहिल्यांदा पकडा तो खंडणीखोर : बजरंग सोनवणे
पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, या हत्यामागे जो मास्टरमाईंड आहे, त्याला पहिल्यांदा पकडा तो खंडणीखोर आहे. मी राजकारण करायला या मोर्चामध्ये सहभागी नाही. सरकार म्हणून तुमच्या जबाबदारी आहे. सरेंडर झालेला आरोपी नेमका पकडला की सरेंडर झाला. पोलिसांनी जर का खरच त्यांना पकडला असेल तर त्यांचा कौतुक आहे. पण वाल्मिक कराड सरेंडर झाला की हे दोघे कसे सरेंडर झाले. देशपांडे नावाचे सरकारी वकील केस घ्यायला घाबरले. कारण यांची दादागिरी गुंडगिरी आणि दडपशाही आहे. काल एक अधिकारी म्हणाला की जर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर माझी चड्डी राहणार नाही. माझी विनम विनंती आहे की तू एकदा प्रेस घे..तुला विविध ठिकाणी पोस्टिंग मिळण्याबाबत कोणाची मेहरबानी आहे. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये समजून जाईल.