बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
पुणे/महान कार्य वृत्तसेवा
पुण्यात एका कार्यक्रमामध्ये बोलताना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी नितीन गडकरी यांच्यासमोरचं पंतप्रधान पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. कार्यक्रमावेळी बोलताना असला खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाहीत? असा सवाल मंचावर उपस्थित होताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केला आहे. नितीन गडकरी कार्यक्रमाच्या स्टेजवरती येताच त्यांनी हा सवाल उपस्थित केला, त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच उत्साह दिसून आला. सर्वांनी टाळ्या आणि शिट्या वाजवल्याचं दिसून आलं.
पुढे बोलतना कोळसे-पाटील यांनी नितीन गडकरी यांना त्यांनी या वक्तव्याचं कारण देखील सांगितलं आहे, असला खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाहीत? कारण तुम्ही तुमच्या बोलण्यातून सर्वसमावेशक दिसता, आणि तुम्ही जर इतिहास पाहिला तर एकही बाम्हण सर्वसमावेशक नेता झालेला नाही. तुम्हाला संधी आहे. तुम्ही पंतप्रधान होऊ शकता. तुम्हाला मी सुयश चिंतीतो, आमची तुम्हाला विनंती आहे, जे देशाला पाहिजे, आमचा नाईलाज आहे, तुम्ही आम्ही वैचारीक विरूध्द असलो तरी आमचा नाईलाज आहे. तुम्ही त्यातल्या त्यात आम्हाला न्याय द्याल असं आम्हाला वाटतं, अशी आशा देखील त्यांनी सांगितलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना कोळसे-पाटील म्हणाले, मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते केंद्राकडून दिलं गेलं पाहिजे. आज महाराष्ट्रातील 48 खासदार आहेत, जवळजवळ सर्व बहुजन समाजाचे आहेत, त्या सर्वांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं की, आम्ही सर्वजण तुमचा पाठिंबा काढून घेत आहोत. नाहीतर तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या, तर मग एका मिनीटात आरक्षण देतील, सर्व खासदारांच्या घरावर एक-एक हजार लोक पाठवा, आणि बसा तिथे, असंही पुढे म्हणालेत.
पुण्यात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होत आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा पार पडतोय. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली असून यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.