Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
सध्याच्या काळात शेती करायची म्हटली की मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यामुळे शेती परवडत नाही असे शेतकरी म्हणत असतात. तर अनेक तरुण हे उच्च शिक्षण घेऊन शेती करण्याचा मार्ग निवडतात. मात्र त्यात चांगले यश मिळाले नाहीतर मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकाच्या शोधात अनेक शेतकरी असतात. आज आम्ही तुम्हाला अशा पिकाबद्दल माहिती देणार आहोत. ज्याच्या लागवडीतून तुम्ही वर्षानुवर्षे लाखो रुपयांची कमाई करू शकता.
नेपियर गवताला असे या पिकाचे नाव आहे. त्याला एलिफंट ग्रास असेही म्हणतात. जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे गवत प्रामुख्याने थायलंडमध्ये घेतले जाते. बाजरीची ही संकरित जात आहे. या गवताची एकदा लागवड करून तुम्ही सुमारे 5 वर्षे पैसे कमवू शकता.
गवताचा कुठे वापर होतो?
या गवताचा उपयोग दुभत्या जनावरांना खाण्यासाठी होतो. यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढते. एवढेच नाही तर या गवतापासून कोळसा आणि सीएनजी बनवण्याचा प्रयोगही सुरू आहे. हे गवत संरचनेत उसासारखे आहे.
हे गवत ओसाड जमिनीतही पिकवले जाते. शेतकऱ्याला हवे असेल तर तो हे गवत ओसाड जमिनीत किंवा शेताच्या कड्यांवरही लावू शकतो. त्याची एकदा लागवड केल्यास त्याद्वारे शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवू शकतात.
लागवड कोणत्या हंगामात करावी?
या गवताची लागवड जुलै ते ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी ते मार्च महिन्यात सुरू करावी. नेपियर गवताच्या देठाला नेपियर स्टिक म्हणतात. ते शेतात लावण्यासाठी किमान दीड ते दोन फूट अंतर ठेवावे. जर तुम्हाला एक बिघा शेतात नेपियर गवत लावायचे असेल तर तुम्हाला किमान 4000 देठ लागतील.
दरम्यान, नेपियर गवताची लागवड करून शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळू शकतो. भारतातील अनेक राज्यांमध्येही शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती करून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम, ओरिसा, केरळ, मध्य प्रदेश, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू इ. ज्या राज्यांमध्ये शेतकरी नेपियर गवताची सर्वाधिक लागवड करतात.