मिरज/महान कार्य वृत्तसेवा
रस्त्यावरुन चालत निघालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील २ लाख १० हजार रुपयांची सोन्याची चेन चोरट्याने हिसकावून दुचाकीवरुन पलायन केले. सायंकाळी ७ च्या सुमारास पार्श्वनाथ कॉलनीतील इंद्रप्रस्थ बंगल्यासमोर घडली. याबाबत रत्नमाला धनपाल खटावकर (रा. इनाम धामणी रस्ता, पार्श्वनाथ कॉलनी, आशियाना बंगला, विश्रामबाग, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
घटनेची माहिती अशी, फिर्यादी रत्नमाला खटावकर या काही वर्षापूर्वी एका प्रशालेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. सायंकाळी ७ च्या सुमारास त्या पार्श्वनाथ कॉलनीतून चालत घराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन एकजण त्यांच्याजवळ आला आणि क्षणार्धात त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावली. खटावकर यांनी आरडाओरडा केला परंतु तोपर्यत चोरटा धामणी गावाच्या दिशेने पसार झाला होता. सदर चेन ५२.५ ग्रॅम वजनाची असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.महान कार्य