कुरुंदवाड/महान कार्य वृत्तसेवा
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कडक कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि उपनिरीक्षक सागर पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ, पाचवा मैल, गणेशवाडी या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. यावेळी विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करत 127 प्रकरणांमध्ये 2 लाख 26 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये मोटार वाहन कायद्यानुसार 92 केसेस दाखल करण्यात आल्या, तर ट्रिपल सीट चालवण्याच्या 15, उघड्यावर मद्यपान करणाऱ्या 5, आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 15 जणांवर कारवाई झाली.
सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या विशेष कारवाईने कायदा मोडणाऱ्यांना चांगलाच इशारा दिला आहे. कुरुंदवाड पोलिसांनी स्थानिकांच्या सहकार्याने शहरात शांतता व सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी घेतलेले हे पाऊल उल्लेखनीय ठरले आहे. या पथकात पो.हे.कॉ.सागर खाडे, फारूक जमादार, राजेंद्र पवार, शिरीष कांबळे आदी सहभागी झाले आहेत.
रात्री उशिरा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार: सपोनि फडणीस
31डिसेंबरच्या रात्री नागरिकांची गर्दी वाढते आणि काही लोक नियमांचे उल्लंघन करतात. या पार्श्वभूमीवर, आम्ही शहरात कायदा-सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी विशेष कारवाई केली. पोलिस दलाने शिवतीर्थ, पाचवा मैल, आणि गणेशवाडी यासारख्या प्रमुख ठिकाणी नाकाबंदी केली आणि मोटार वाहन कायदा तसेच इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे.