Spread the love

कबनूर/महान कार्य वृत्तसेवा

सततच्या वाहतूक कोंडीमुळे चर्चेत असलेल्या कबनूर चौकात, जलजीवन योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे ट्रॅक्टर व अवजड वाहने या खड्डयात अडकत आहेत.त्यामुळे वाहन धारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कबनूर चौक वाहतूक कोंडीचा अड्डा बनला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याने,तर लोकप्रतिनिधीनी बघ्याची भूमिका घेतल्याने कबनूर मधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट बनली आहे.याचा फटका नवनिर्वाचित आमदार राहुल आवाडे यांनाही बसला होता.त्यामुळे त्यांना वाहतूक सुरळीत करावी लागली.त्यातच सध्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केल्याने,मंगळवारी रात्रीपासून  ऊसाचे ट्रॅक्टर अडकण्याची मालिकाच सुरू झाली आहे.